जालना, – जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवार, दि. 4 जून 2024 रोजी जालना येथील तिसऱ्या टप्प्यातील एमआयडीसीतील सरस्वती अॅटो कम्पोनन्टस प्रा.लि. समृद्धी महामार्ग येथेदि. 4 जून रोजी प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि झालेल्या मतदानापैकी 16 टक्के मतं जर उमेदवाराला पडली तरच या उमेदवारांचे डिपॉझिट परत मिळते अन्यथा ते जप्त केल्या जाते. त्यानुसार यावर्षी तेरा लाख 61 हजार 217 एवढे मतदान झाले होते. 16% च्या हिशोबाने जर 85हजार 76 एवढे मतदान पडले तर डिपॉझिट परत मिळेल अन्यथा ते जप्त होईल . तीनच उमेदवार हा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सन 2019 च्या निवडणुकीमध्ये एकूण 20 उमेदवार उभे होते. त्यापैकी 17 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. ते 75 हजार पाचशे आठ एवढे मत देखील प्राप्त करू शकले नाहीत.
मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयार केली आहे. सुमारे 1300 कर्मचाऱ्यांचा मतमोजणी प्रक्रियेत सहभाग राहणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 अशा एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. तर पोस्टल मतदान पत्रिकेसाठी एकूण 10 टेबल असणार आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दि. 13 मे 2024 रोजी मतदान पार पडले. जालना मतदार संघात जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सर्व मतदारसंघातील एकूण 2 हजा
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172