जालना- नुकसानीपेक्षा भरपाई जास्त घेतली की आपण सहजच म्हणून जातो “चोरावर मोर “तसाच काहीसा प्रकार जालन्यात चोरांच्या बाबतीतही घडला आहे. चोरी केली 457,856 रुपयांची आणि पोलिसांनी जप्ती केली पाच लाख तेहतीस हजार एकशे पन्नास रुपयांची. आणि आणखीही माल जप्त करणे बाकीच आहे.
नवीन मोंढा मध्ये मुकेश मोतीलाल काबरा यांचे विविध प्रकारच्या तेलाचे गोडाऊन आहे. या गोडाऊन मधून दिनांक 3 जून रोजी 4,57,886 रुपयांचे पॅराशुट सफोला, गोल्ड, निहार, शांती, अशा तेलांच्या बॉटलची चोरी झाली होती आणि यासंदर्भात चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात तेलाची चोरी झाली हा गंभीर गुन्हा लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हा शाखेला तातडीने मार्गी लावण्यासाठी सोपवले .त्यानुसार या शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खानाल कामाला लागले आणि या प्रकरणाची माहिती घेत असताना एक धागा हाती लागला. त्यानुसार त्यांनी द्वारका नगर जालना येथे राहणाऱ्या शेख असेफ शेख याकूब वय 36 वर्ष आणि त्याच्या जवळ राहणाऱ्या विकास राम कुमकर व 21 वर्ष या दोघांना ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. त्यासोबत त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे .सुमारे साडेचार लाख रुपये किमतीच्या तेलाच्या बॉटल नेण्यासाठी वाहन ही तसेच तगडे वापरले होत अशोक लेलँड कंपनीचा ट्रक, आणि बुलेट मोटरसायकल .या वाहनांचा त्यांनी वापर केला होता पोलिसांनी ही दोन्ही वाहने तर जप्त केलीच आहेत त्याच सोबत गुन्ह्या मध्ये चोरी केलेल्या तेलांच्या बॉटल पैकी दोन लाख 31 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल म्हणजे तेलाच्या बॉटल आणि ही दोन वाहने जप्त केली आहेत. मुद्देमाल आणि जप्त केलेल्या वाहनांची किंमत ही पाच लाख 33 हजार 150 रुपये होते आणि आरोपींनी चोरलेल्या मालाची किंमत ही चार लाख 57 हजार 856 होते त्यामुळे चोरांनी चोरी केलेल्या मालापेक्षा पोलिसांनी जप्त केलेल्या मालाची किंमत जास्त आहे .आरोपींनी त्यांच्यासोबत आणखी दोन साथीदार असल्याचेही सांगितले आहे. दरम्यान उर्वरित दोन आरोपी आणि बाकी असलेल्या तेलाच्या बॉटल जप्त करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस तपास करीत आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172