Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » जि.प.च्या 109 HM ची सोमवारी पदभरती; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन घोषणाबाजी
    Jalna District

    जि.प.च्या 109 HM ची सोमवारी पदभरती; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन घोषणाबाजी

    EdTvBy EdTvJune 8, 2024No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना -शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत आणि दोन्ही शिक्षण विभागातील शिक्षकांच्या समस्या समोर यायला लागल्या आहेत. त्यातच शिक्षणाधिकारी भेटत नसल्यामुळे संतप्त शिक्षक संघटना ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाडा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे या भेटत नसल्यामुळे तसेच कार्यालयात इतर कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे रिकाम्या खुर्चीलाच निवेदन दिले आहे. तर काही प्राथमिक शिक्षकांनी श्रीमती मीना यांची भेट घेऊन समस्या मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी हा चेंडू प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखील यांच्याकडेच सोपविला. श्री .दातखिळ यांनी या शिक्षकांची समजूत काढत तूर्तास तरी या शिक्षकांना वाटी लावले आहे. दरम्यान शिक्षकांच्या इतर समस्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी सकारात्मक भूमिका घेत पवित्र पोर्टल वरून आलेल्या 263 आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्या 40 शिक्षकांना पदस्थापना देण्यास सुरुवात केली आहे. पवित्र पोर्टल वरून आलेले शिक्षक हे तरुण असल्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या दुर्गम भागात नियुक्ती देणार असल्याचे  सांगितले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये मुख्याध्यापकांची 109 पदे रिक्त आहेत ही पदे देखील सोमवारी भरल्या जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

    शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. जालना कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन करण्यात आले.मागील बऱ्याच दिवसापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असणारे प्रश्न संदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तक्रार निवारण बैठक आयोजित करणे बाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात कर्मचारी यांचे वैयक्तिक प्रकरणे व सामूहिक प्रकरणे संदर्भात न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती.परंतू संबंधित शिक्षणाधिकारी यांनी आचार संहितेचे कारण देऊन वेळकाढू पणा केलेला आहे. संघटनामार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे धरणे आंदोलन करून प्रशासनास जागे करीत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील दोन शिक्षक आपल्या न्याय हक्क मागणीसाठी जि.प.समोर आमरण उपोषण सूरू केले असून या उपोषणास मराठवाडा शिक्षक संघाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यामध्ये श्री.प्रदीप विश्वनाथ राठोड म.स्था. जैन विद्यालय जालना यांची विनाअनुदानित वरून अनुदानित बदली आदेश मागील सहा महिन्यापासून शिक्षणाधिकारी यांनी प्रलंबित ठेवलेला आहे.परिणामी वेतनाअभावी संबधित शिक्षकाची उपासमार होत आहे.तसेच दुसरे उपोषणार्थी श्री.बाळासाहेब देविदास लहाने (स.शि.)श्री विनायक विद्यालय चांदई एक्को ता.भोकरदन हे अतिरिक्त झाले असून संबंधिताचे वेतन सदरील शाळेने थांबविले असल्यामुळे संबंधित शिक्षकाची उपासमार होत आहे. तसेच भगवान पालकर यांचा पेन्शन प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेला आहे. दत्ता देशमुख यांची सेवा जेष्ठता सुनावणी दोन वेळेस  जाणीवपूर्वक प्रलंबित आहे. या सर्व प्रकरणासंदर्भात संघटना पातळीवर वारंवार शिक्षणाधिकारी यांना पत्र व्यवहार करण्यात येत असून संबंधित याबाबत कोणतेही योग्य कार्यवाही करीत नसल्यामुळे तीव्र निदर्शने करण्यात येत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले. यावेळी उपोषणकर्त्यासह जिल्हाध्यक्ष श्री. रमेश आंधळे सचिव  संजय येळवंते केंद्रीय कार्यकारणी उपाध्यक्ष श्री. वरवटे,केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रेमदास राठोड,आरेफ कुरेशी,प्रा.मारुती तेगमपुरे,जगनराव वाघमोडे,प्रद्युम्न काकड, हाकीम पटेल,दिपक शेरे,नारायण मुंढे, जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    ceo varsha meena zp zpceo जालना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मराठवाडा शिक्षक संघ माध्यमिक शिक्षणाधिकारी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleश्री जिनाकुशलसुरी दादावाडी यांचा प्रतिष्ठा महोत्सव; विविध राज्यातून भाविक येणार
    Next Article पोलीस तपासणीची बतावणी करून लुटणारी परळीची इराणी गॅंग पोलिसांच्या ताब्यात
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,008 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,175 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025529 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.