Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » पाच दिवस, पाच जण,2200 किमीचा प्रवास, दोन कोटी फसवणूक प्रकरणी आरोपीकडून 44 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
    Jalna District

    पाच दिवस, पाच जण,2200 किमीचा प्रवास, दोन कोटी फसवणूक प्रकरणी आरोपीकडून 44 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

    EdTvBy EdTvJune 14, 2024No Comments4 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना -गुंडेवाडी परिसरात असलेल्या बालाजी उद्योग या कंपनीचे भागीदार संजय मनोहरराव शिंगारे यांना दोन कोटी रुपयांना फसविण्यात आले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी यापूर्वीच रोशन सालदाना या आरोपीला कर्नाटक मधून ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीमध्ये असताना त्याची चौकशी केल्यानंतर त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या शाखेच्या पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन पाच दिवस ,कर्नाटक राज्यात प्रवास केला या प्रकरणाचे तपासीअधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्यासोबत रवी गायकवाड, समाधान तेलंग्रे ,आरोपी आणि अन्य असे एकूण पाच जण होते. कर्नाटक राज्यातील बेंगलोर मेंगलोर आदि ठिकाणी फिरून ,2200 किलोमीटरचा प्रवास करून सर्व माहिती गोळा करून रोशन सालदाना याने या पैशांमधून खरेदी केलेले तीन लाखांचे सोने आणि 42 लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींपैकी चंद्रशेखर नरसमुल्ला, चित्रदुर्ग हा प्रमुख आरोपी आहे. त्याच्यासह इतर दोघेही सध्या फरार आहेत. दरम्यान पोलिसांनी या आरोपींचे सर्व बँक खाते गोठवले आहेत. आजचा हा तपास लावण्यासाठी आर्थिक गुन्हा शाखेचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक रमेश जायभाये सहाय्यक पोलीस निरीक्षक ,प्रदीप एकशिंगे ,राजाराम तडवी, गणेश सुरवसे, व पोलीस अमलदार समाजात तेलंग्रे गोकुळसिंग कायटे, गजू भोसले ,फुलसिंग घुसिंगे, चंद्रशेखर मांटे, रवींद्र गायकवाड, गणपत पवार ,ज्ञानेश्वर मस्के, महिला अंमलदार निमा घनगाव ,मंदा नाटकर या आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी माहिती गोळा केली.

    या प्रकरणाची पार्श्वभूमी  ,संजय मोहन शिंगारे हे एका भागीदारासोबत श्री .बालाजी उद्योग नावाची खाद्यतेल निर्मितीची कंपनी चालवतात. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात सोयाबीन  खरेदी करावे लागते आणि त्यासाठी रोख रकमेची नेहमीच गरज पडते. वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत ते हा निधी उभा करतात.त्यांची व्यवसायाने सीए असलेल्या मुंबई येथील रहिवासी रुपेश पारेख यांची ओळख झाली आणि त्यांनी बँकेपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतो म्हणून श्री. साई कन्सल्टंट चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे नाव सुचवले. त्यासोबत या कंपनीचे जबाबदार अधिकारी म्हणून रोशन सालदाना, राहणार बैजल चर्च, इवानी हाऊस, सलदाना कंपाऊंड, मेंगलोर जिल्हा मेंगलोर कर्नाटक  यांच्यासोबत बोलणी करून देतो म्हणून चित्रदुर्ग कर्नाटक येथे हे दोघेजण गेले. त्यावेळी रोशन सालदाना यांनी अडीचशे कोटी रुपये तीन टक्का प्रति वर्षे व्याज दराने देण्याचे आश्वासन दिले आणि कंपनीच्या आणखी काही अधिकाऱ्यांची ओळख करून दिली.तेंव्हा  रोशन सालदाना हे राजकीय पुढार्‍यांचे नातेवाईक असून ते वेगवेगळ्या कंपन्यांना अर्थ पुरवठा करतात असे सांगण्यात आल्यामुळे संजय शिनगारे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर रोशन सालदाना हा मर्सिडीज कार क्रमांक के ए 19 एम जे 80 50 घेऊन संजय शिनगारे यांच्या श्री बालाजी उद्योग नावाच्या गुंडेवाडी शिवारात असलेल्या कंपनीत येऊन भेटला . त्यावेळी कर्ज देण्यासाठी दोन टक्के प्रोसेसिंग फी द्यावी लागेल असे सांगितले ,चर्चेअंती ही फी एक टक्का ठरली आणि तो निघून गेला. त्याने दिलेल्या मेल आयडीवर आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे संजय शिनगारे यांनी पाठवून दिली. दिनांक 3 जुलै 2023 रोजी रोशन सालदाना याने संजय शिनगारे यांना फोन करून तुमचे कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे प्रोसेसिंग फी म्हणून एक टक्का पाठवा तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा करतो असे सांगून त्याने त्याच्या बँकेच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी कॅन्सल केलेले चेकही पाठवले .त्यानंतर संजय शिनगारे यांनी कंपनीच्या भागीदारांसोबत चर्चा करून दिनांक 4 मे 2023 ,दिनांक पाच जुलै 2023, दिनांक 6 जुलै 2023, दिनांक सात जुलै 2023 ,अशा पाच वेळा प्रत्येकी 50 लाख रुपये असे एकूण अडीच कोटी रुपये प्रोसेसिंग फी म्हणून रोशन सालदाना याला अदा केली. तत्पूर्वी रोशन सालदाना ज्यावेळेस जालन्याला आला होता त्यावेळी पाच कोरे धनादेशही श्री. साई कन्सल्टंट चित्रदुर्ग कर्नाटक कंपनीला दिले होते. हा सर्व प्रकार झाल्यानंतर आठ दिवसात कर्ज रक्कम तुमच्या खात्यावर होईल असा विश्वास रोशन सालदाना यांनी दिला मात्र तसे झाले नाही. त्यानंतर पुन्हा पंधरा ते वीस दिवस रक्कम जमा होण्याची वाट संजय शिंगार यांनी पाहिली परंतु तरीही ती जागा झाली नाही. त्यानंतर पुन्हा फोन लावल्यानंतर रोशन सालदाना याने घरातील नातेवाईकाचे निधन झाले आहे पंधरा दिवसांनी फोन लावा असा बहाना केला. पंधरा दिवसांनी परत फोन लावल्यानंतर ईडीची रेड पडली आहे असे सांगून त्याने फोन बंद केला. त्याच वेळी संजय शिंगारे यांना आपली फसवणूक झाल्याची शंका आली म्हणून सिंगारे हे स्वतः चित्रदुर्ग येथे जाऊन रोशन याला भेटले त्यावेळी देखील त्याने आश्वासन देऊन परत पाठवले. त्यानंतर दिनांक सात मे 2024 ते 11 मे 2024 दरम्यान श्री. साई कन्सल्टंट चित्रदुर्ग येथे संजय शिनगारे हे भेट देत होते परंतु कार्यालय बंदच दिसत होते .तेव्हा त्यांनी आजूबाजूला माहिती घेतली असता या कंपनीने डोंबिवली येथील बिल्डर कडून अशाच प्रकारे खोटे आश्वासन देऊन 80  लाख रुपये प्रोसेसिंग फी च्या बदल्यात घेतले आहेत परंतु कर्ज दिलेले नाही. अशी माहिती मिळाली.  तसेच त्याचे इतर साथीदार देखील बनावट असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संजय शिनगारे यांची आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली जालन्यात परतल्यानंतर चंदंनझीरा पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 3 जुलै 2023 ते 11 मे 2024 दरम्यान अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली .या तक्रारीच्या अनुषंगाने चंदंनझीरा पोलिसांनी रोशन सालदाना याच्यासह श्री साई कन्सल्टंस चित्रदुर्ग कर्नाटक कंपनीचे एमडी ,वकील आणि इतरांवर भादवि कलम 420 चा गुन्हा नोंदविला आहे

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    Eow ipc 420 आर्थिक गुन्हे शाखा कर्नाटक दोन कोटी संजय शिनगारे
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleबालकाला अमानुष मारहाण करून चटके देणाऱ्या पित्या विरोधात गुन्हा दाखल
    Next Article कोणी जागा देता का जागा! शासकीय महिला राज्यगृहाला पाहिजे जागा
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,010 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,176 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025529 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.