जालना- शरद पवार मुख्यमंत्री असतानाच त्यांनी मंडल आयोगाला मान्यता दिली. एकीकडे ते ओबीसी सोबत आहेत असे म्हणतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार ,खासदार मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी पत्र देतात. त्यांच्याच पक्षाचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी जरांगेंसोबत वारंवार गुप्त बैठका घेतलेल्या उघड झाल्या आहेत, त्यांनी दिलेला पाठिंबाही उघड झाला आहे .त्यामुळे शरद पवार यांनी आरक्षणासंदर्भात आपण कोणासोबत आहोत? ही भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडीगोद्री येथे नुकत्याच झालेल्या ओबीसी समाजाच्या आंदोलनातील उपोषण कर्ते नवनाथ वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
यावेळी नवनाथ वाघमारे यांनी नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांच्यावरही आरोप केले श्री .वाघमारे म्हणाले “उपोषण स्थळावर मला भेटण्यासाठी खासदार डॉक्टर कल्याण काळे आले होते. त्यावेळी मराठा समाजाला जसे पत्र दिले तशाच पाठिंब्याचे पत्र आम्हाला द्या!” अशी मागणी केली होती परंतु त्यांनी ते पत्र मी नाही तर माझ्या मुलाने टाईप केले होते, अशी थाप मारून तेथून पळ काढला ते अजून पर्यंत संपर्कात आले नाहीत.
मनोज जरांगे हे मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या ड्रोन कॅमेरा हा एक स्टंटबाजीचा विषय आहे. त्यांच्याच कोणत्यातरी कार्यकर्त्याने हे केले असेल आणि आता पुन्हा सुरक्षा पुरवा अशी मागणी करत आहेत .असे म्हणून आम्हाला सरकारने वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका देखील त्यांनी सरकारवर केली.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172