जालना- कुंडलिका नदीच्या काठावर काचांच्या तुकड्यात रेखीव काम केलेलं मराठवाड्यातील एकमेव मंदिर असलेल्या मंमादेवी संस्थानवर पहिल्यांदाच भाविकांकडे मदत वागण्याची वेळ आली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारी मुळे  मदत मागून संस्थानचा डोलारा चालवावा लागत आहे .

जुना आणि नवीन जालना च्या मध्यभागातून कुंडलिका नदी वाहते. या नदीच्या तीरावर हे मंमादेवी मंदीर आहे. दोन दिवसातून किमान एकदा तरी जालन्यातील नागरिकाला या मंदिराच्या जवळून जावेच लागते. नवीन जालन्यात जाताना देवीच्या पाठीमागून आणि जुन्या जालन्यात येतांना देवीच्या समोरून अशा मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यामुळे आपसूकच त्याला देव दर्शन होते आणि दर्शन घेणारा भाविक रिकाम्या हाताने दर्शन घेत नाही. त्यामुळे या मंदिराची दानपेटी कोरोना काळ व्यतिरिक्त नेहमी भरलेली होती.  त्यानुसार खर्चही होतो, स्वच्छता, रंगरंगोटी, सुशोभीकरण ,यावर देखील मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. 

रंगीबेरंगी काचाचा तुकड्यांमध्ये सुशोभित केलेलं हे मराठवाड्यातील एकमेव मंदिर असल्याचा दावा या मंदिराचे विश्वस्त नंदकुमार परदेशी यांनी केला आहे. दरम्यान दीड वर्षांमध्ये आलेल्या अडचणी संदर्भात सांगताना नंदकुमार परदेशी म्हणाले,” मंदिर बंद असल्यामुळे नारळ फुल मिठाई या व्यावसायिकांचे धंदे तर बंद झालेच, मात्र गेट बंद असल्यामुळे दानही बंद झालं. त्यामुळे मंदिराचा खर्च चालवण्यासाठी भाविकांकडून मदत मागावी लागली आहे. मंदिराच्या उत्पन्नासाठी असलेले मंगल कार्यालय देखील दोन वर्षांपासून बंदच आहे .त्यामुळे जमा आणि खर्च यांची सांगड घालताना खूप त्रास होत आहे. याहीपेक्षा जास्त त्रास हा भाविकांना समजावून सांगण्यात होत आहे. मंदिर उघडण्यासाठी भाविक दबावतंत्र वापरत आहेत. त्याही पुढे जाऊन आता भांडणे करायला लागले आहेत .त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

* ताज्या आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app.*9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version