केज- बीड जिल्ह्यातील केज येथील संघटित गुन्हेगार उमेर उर्फ पापा मुस्ताक पोराकी वय 28 वर्षे राहणार रोजा मोहल्ला केज, जिल्हा बीड .याची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये छत्रपती संभाजी नगर येथील हरसुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.
उमर उर्फ पापा मुस्ताक याच्यावर केज पोलीस ठाण्यामध्ये 12 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, बलात्कार करणे, पळून नेणे, जबरी चोरी करणे, अवैध शस्त्र बाळगणे ,दंगा करणे अशा गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्याचा समावेश आहे. त्यापैकी नऊ गुन्हे हे न्यायप्रविष्ठ आहेत तर तीन गुन्हे हे तपासावर आहेत. दरम्यान या गुन्हेगाराला वर्तणूक सुधारण्यासाठी दिनांक 21 जुलै 2023 ला प्रतिबंधात्मक कारवाईची नोटिसे देण्यात आली होती परंतु त्याच्या वरतूनुकीमध्ये काहीच फरक पडला नाही. त्यामुळे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आनंदकुमार ठाकूर यांच्यामार्फत बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये उमेद याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 11 जुलै रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या संघटित गुन्हेगाराला छत्रपती संभाजी नगर येथील हरसुल कारागृहात दाखल केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172