धाराशिव- हॉटेल समोर बांधलेले बेवारस शेळी आणि बकरे सोडून देऊन कारवाई न करता पाच हजार रुपयांची बक्षीस मागणाऱ्या परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक असं एका हवलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये या प्रकरणातील तक्रारदाराचे सोलापूर धुळे महामार्गावर उपळाई पाटीजवळ दिनेश व्हेज अँड नॉनव्हेज नावाचे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंट समोर तीन दिवसांपूर्वी तीन शेळ्या आणि दोन बकरे बेवारस स्थितीत दिसले. खरंतर अशा बेवारस स्थितीत रेस्टॉरंट समोर शेळ्या आणि बकरे दिसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र किसन बहुरे, कळंब पोलीस ठाणे वर्ग दोन आणि त्यांचे सहकारी हवालदार महादेव तात्या भाऊ मुंडे वय 37 वर्ष या दोघांनी तक्रारदार याच्यावर कारवाई न करता, गुन्हा नोंद न करता महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०/ ११७ अन्वये किरकोळ कारवाई करून सोडून दिले आणि तक्रारदाराला मदत केली .या मदतीच्या बदल्यात बक्षीस म्हणून रामचंद्र बहुरे आणि महादेव मुंडे यांनी आज दिनांक 19 रोजी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची पंचा समक्ष लाच मागीतली आणि ही लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही रंग हात पकडले आहे. त्यामुळे रामचंद्र बहुरे हे परविक्षाधीन कालावधीमध्ये कशाचे प्रशिक्षण घेत होते? कायद्याचे की… अशी चर्चा पोलीस वर्तुळात चालू आहे. धाराशिव जिल्ह्याचे प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी ही कारवाई केली.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172