छत्रपती संभाजी नगर- आपल्या अंगी आहे ती गुणवत्ता वाढवून नवीन गुणवत्ता आणि अनुभव संपादन करून त्या जोरावर विद्यार्थ्यांना सज्ञान करण्यासाठी अनेक शिक्षक उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे येतात. त्यामध्ये पीएचडीही करतात .ही पीएचडी करताना योग्य मार्गदर्शकही मिळायला हवा, परंतु मार्गदर्शकात जर लाच मागत असेल तर त्याच्याकडून शिकायचे काय?. अशीच घटना सोमवार दिनांक 19 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या डॉ. रफिक झकिर या महाविद्यालयात उघडकीस आली आहे. या महाविद्यालयातील चौघा विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याचा गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये विशेष म्हणजे पीएचडीच्या मार्गदर्शक होत्या महिला मार्गदर्शक आणि त्यांच्या मुलाने संगणमत करून या पीएचडी उमेदवाराकडून दरमहा दहा हजार रुपयांची लाच अशी एकूण पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी पन्नास हजारांचा पहिला हप्ता घेताना या मायलेकरांना रंग यात पकडले.

1) श्रीमती डा‌‌ॅ. एराज सिद्दीकी, संशोधक मार्गदर्शक (phd गाईड), ग्रंथपाल, डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, नवखंडा छत्रपती संभाजीनगर रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर ( वर्ग-1 )
2) शेख उमर शेख गणी वय 52 वर्ष व्यवसाय नोकरी ग्रंथालय परिचारक डॉ रफिक झकेरिया महिला महाविद्यालय नवखंडा छत्रपती संभाजीनगर ( वर्ग- 4)3) डॉ. सिद्दीकी मो. फैसोद्दीन ऊर्फ समीर मो. रियाजुद्दिन वय 36 वर्ष, व्यवसाय- सहाय्यक संचालक, ERS रिसर्च अँड टेक्नोलॉजी pvt. LTD, मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर (खाजगी इसम)
4) सिद्दीकी फराज मो. रियाजुद्दिन वय 31 वर्ष, व्यवसाय- संचालक, ERS रिसर्च अँड टेक्नोलॉजी pvt. LTD, मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर (खाजगी इसम)▶️ लाच मागणी रक्कम –
नोव्हे 2022 ते नोव्हे 2026 पावेतो दरमहा 10,000/- रू प्रमाणे एकुण 5,00,000/- रु ची लाच मागणी करून त्यातील 50,000/- रुपये रक्कम स्विकारली.▶️ लाच पडताळणी दिनांक –
24/07/2024, 25/07/2024, 27/07/2024,
29/07/2024 ▶️ लाच स्वीकारली दिनांक –
19/08/2024 ▶️ स्विकारली लाच रक्कम – 50,000/- रुपये ▶️ कारण- यातील फिर्यादी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयामध्ये विद्यावाचस्पती PHD चे संशोधन करीत आहे. त्यांना विद्यापीठाकडून संशोधनासाठी संशोधक मार्गदर्शक म्हणुन आलोसे क्र.1 श्रीमती डॉ.एराज सिद्दीकी मॅडम, ग्रंथपाल, डॉ रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, नवखंडा, छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारदार यांना महाराष्ट्र शासनाचे म.ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर यांचेकडून अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) म्हणुन दरमहा 50,400 रूपये मिळत आहेत. सदर फेलोशिप तक्रारदार यांना मिळण्यासाठी तक्रारदार यांना tyanche प्रोग्रेस रिपोर्ट, स्वयं घोषणा पत्र, हजरी पत्रक, HRA प्रमाणपत्र, तिमाही सहामाही प्रोग्रेस रिपोर्ट यावर आलोसे क्रं 1 यांची सही घेऊन सदर कागदपत्रे विद्यापीठात सादर करावे लागतात. सदर कागदपत्रा वर सह्या करण्यासाठी तसेच तक्रारदार यांचे रीपोर्ट पॉझिटिव्ह देण्यासाठी आलोसे क्र.1 डॉ. सिद्दीकी या तक्रारदार यांचेकडे दरमहा 10, 000 रुपये प्रमाणे लाचेची मागणी करीत आहे, अशी तक्रारदार यांनी तक्रार दिली आहे.
सदर तक्रारीच्या अनुशंगाने दि.24.07.2024 रोजी तक्रारदार यांना  शेख उमर शेख गणी यांनी तक्रारदार यांचे कागदपत्रावर श्रीमती डॉ. एजाज सिद्दिकी यांची सही घेऊन देण्यासाठी 25,000/- रुपयाची लाचमागणी केली. त्यानंतर दि. 27.07.2024 रोजी श्रीमती सिद्दिकी यांनी तक्रारदार यांना त्यांचा मुलगा डॉक्टर सिद्दिकी मोहम्मद फसुद्दीन यास भेटण्यासाठी सांगितले. त्यानंतर दि. 29.07.2024 रोजी आरोपी डॉक्टर सिद्दिकी यांनी त्यांची आई श्रीमती डॉक्टर एजाज सिद्दिकी यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यास तुमचे सगळे रिपोर्टवर आलोसे क्र 1 यांचे सह्या करुन देण्यासाठी, तसेच RAC रिपोर्ट पाॅझीटीव्ह देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे त्यांना मिळणारे फेलोशीप मधुन नोव्हे 2022 ते नोव्हे 2026 पावेतो दरमहा 10,000/- रू प्रमाणे एकुण 5,00,000/- रु ची लाच मागणी करून त्यातील 50,000/- रुपये स्विकारन्याचे मान्य केले. त्यावेळी तक्रारदार यांनी श्रीमती सिद्दिकी यांना फोन केला त्यावेळी श्रीमती सिद्दिकी यांनी त्यांच्या मुलाला डॉ. सिद्दिकी याला सांगतील्या त्याप्रमाणे रक्कम देण्यास सांगून लाच मागणी केली आहे. त्या अनुषंगाने आज दि.19.08.2024 रोजी श्रीमती डॉक्टर एजाज सिद्दिकी यांनी लाचेची रक्कम आरोपी क्र. 4 यांचेकडे देण्यास सागितले. त्यानंतर तक्रारदार यांचे कडून आज दि. 19.08.2024 रोजी ERS कोचिंग क्लासेस येथे सिद्दिकी फरार मोहम्मद रियाजुद्दीन यांनी लाचेची रक्कम 50000 रुपये स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.आरोपी क्रं 2, 3 व 4 यांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर शहर येथे गुन्हा दाखल झाला आहे.▶️ *सापळा अधिकारी* –
शंकर म.मुटेकर,पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी ला.प्र.वि. जालना. मो.नं. 9767108455▶️ *सापळा पथक*-गजानन घायवत, गजानन खरात, शिवाजी जमधडे, गणेश चेकें, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, जावेद शेख, भालचंद्र बिनोरकर, विठ्ठल कापसे,

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version