जालना- युरोपियन युनियन मधील बहुतांश देश औद्योगिक दृष्ट्या संपन्न आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून तिथे कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. हे कुशल मनुष्यबळ भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या अनुषंगाने सन 2015 मध्ये जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी महाराष्ट्र राज्याने कौशल्य वृद्धी बाबत सामंजस्य कराराचा प्रस्ताव मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर दिनांक 31 मे 2023 रोजी एक समिती गठीत करून या समितीने केलेल्या नियोजनाचा प्रस्ताव केंद्र केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयास सादर केला होता. या प्रस्तावाला या मंत्रालयाने दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिली.त्या अनुषंगाने आता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 11 जुलै 2024 रोजी हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाच्या माध्यमातून जे विद्यार्थी कुशल आहेत म्हणजेच( डिप्लोमा होल्डर) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, नरसिंग हॉटेल मॅनेजमेंट, प्रयोगशाळा सहाय्यक इलेक्ट्रिशियन विक्री प्रतिनिधी प्लंबर वाहनचालक वेल्डरअसे  अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत, त्यासोबत इतर क्षेत्रातही त्यांच्याकडे तंत्रज्ञान अवगत आहे, अशा विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणारी जर्मन भाषा शिकवून त्यांना जर्मनी येथे नोकरीसाठी पाठविला जाणार आहे. तीन महिन्याचा हा कोर्स आहे आणि तो पूर्णपणे शासनाच्या मार्फत मोफत शिकविला जाणार आहे. त्यानंतर घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्या उमेदवाराला जर्मनी येथे गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार आहे. एवढेच नव्हे तर त्या उमेदवाराला त्या क्षेत्रात आणखी प्रशिक्षण हवे असेल तर ते देखील शासनाच्या वतीने दिल्या जाणार आहे. तसेच या उमेदवाराला लागणारा प्रवास खर्चही शासनामार्फत केल्या जाणार आहे. त्यामुळे आता डिप्लोमा होल्डर असलेल्या उमेदवारांना थेट जर्मनीत नोकरी मिळू शकते. महाराष्ट्र शासनाने जर्मनीतील बाडेन- बुटेनबर्ग या राज्याला दहा हजार कुशल मनुष्यबळ पुरविण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे .या प्रकल्पातून आपल्याकडील गरजूंना नोकरीही मिळेल आणि परदेशी चालनही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येईल असा याचा उद्देश आहे. या प्रकल्पासंदर्भातील आणि उमेदवारांच्या इतर माहितीसाठी आपण शासनाच्या अधिकृत वेबसाईटला ही भेट देऊ शकता .ही वेबसाईट आणि उमेदवारांची पात्रता व इतर माहितीसाठी वर दिलेला जिल्हा व प्रशिक्षण संस्था जालनाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांचा व्हिडिओ पहा.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version