जालना- सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सोमवार दिनांक 23 रोजी जालना बंदची हाक देण्यात आली आहे .या संदर्भात शहरातील काल एका मंदिरात सर्व संघटनांच्या हिंदूंची एक बैठक घेण्यात आली.  त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या हिंदू धर्मीय लोकांनी गुरुवार दिनांक 19 रोजी झालेल्या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला .

niramy

गुरुवारी  मुस्लिम समाजाच्या वतीने ईद मिलादुन्नबी निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती आणि या मिरवणुकी दरम्यान हिंदूंच्या दोन दुकानावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी ही बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच बडी सडक येथील श्रीराम मंदिरापासून जुन्या जालन्यातील गांधी चमन  पर्यंत निषेध मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे .या बैठकीसाठी मंदिराच्या बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version