जालना- “आईने फक्त मला एकदा माझ्या नावाने हाक मारावी अशी मनोमन इच्छा आहे. परंतु ती पूर्ण होणार नाही हे देखील माहित आहे. म्हणूनच माझ्या आई-वडिलांना जसा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे तसा इतरांना करण्याचे काम पडू नये, त्यांच्या मदतीला मी धावून जावे ,अशी माझ्या आईची इच्छा आहे. खरं तर आई खूप रागीट स्वभावाची आहे. माझ्याकडून काही चुका झाल्यानंतर तिने धपाटे देखील द्यायला मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळेच मी आता Disli हा कोर्स करत आहे. जेणेकरून भविष्यामध्ये मूकबधिर, कर्णबधिर, दृष्टीहीन, गरजूंना माझी मदत व्हावी ,शाळा न्यायालय आणि सर्वच ठिकाणी त्यांच्या भावना, त्यांची भाषा माझ्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवता येतील हा माझा प्रयत्न आहे .लहानपणी मी माझ्या आई-वडिलांसारखी कर्णबधिर मूकबधिर होऊ नये म्हणून ते मला मुद्दामहून  मला शेजाऱ्यांकडे खेळायला पाठवत होते. जेणेकरून त्यांचे दुःख माझ्या वाट्याला येऊ नये असे असले तरी आज समर्थपणे त्या दोघांनी या संकटावर मात करून सामान्य माणसांप्रमाणे घर चालवत आहेत.”कु.निराळी मनोज पटवारी.

nrg

Disli(diploma in indian sing language interpretation) म्हणजेच भारतीय सांकेतिक भाषा. श्रवणदोष, कर्णदोष ,नेत्रदोष, असलेल्या व्यक्तींसाठी त्यांच्या पुनर्वसन क्षेत्रात कर्मचारी विकसित करणे हा या डिप्लोमाचा उद्देश आहे. प्रशिक्षणार्थींना भारतीय सांकेतिक भाषा व इतर मौखिक भाषांमध्ये ज्ञान कौशल्य आणि क्षमता प्राप्त करण्यासाठी हा कोर्स सक्षम करतो. निरालीच्या घरी गेल्यानंतर सामान्य परिस्थिती जाणवली. परंतु निराली घरी नसताना परिस्थितीला तोंड देण्याच्या यांच्या कल्पना काही वेगळ्याच आहेत .उदाहरणच द्यायचे झाले तर दारावरची घंटी वाजवली तर निरालीच्या आईला ऐकायला आणि बोलता येत नाही म्हणून घंटीचे बटन दाबले तर घरातील लाईट चालू बंद होतात. ऐकायला येत नसल्यामुळे घरात कुत्रे पाळले आहे. जेणेकरून दारात कोण येतात ते भुंकायला सुरुवात करते. आणि त्याच्या हावभावावरून कुणीतरी आल्याच्या समजते. झोपल्यानंतर हे कसे कळणार ?त्यामुळे पलंगाला व्हायब्रेशन लावलेले आहे . रात्रीच्या वेळी जर कोणी घरी आले आणि दारावरची घंटी वाजवली तर ते लगेच समजते. अशा अनेक कल्पना त्यांनी साकारून संकटावर मात करून सक्षमपणे सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगत आहेत. मग आपल्यासारख्या धडधाकट, हात, पाय ,डोळे कान, असताना त्यांना मदत का करू नये? मेहनत कष्ट का करू नयेत?

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version