घनसावंगी- मी शांत आहे तोपर्यंत तुमचा आहे , तुम्ही डावलले तर मी जनतेचा आहे असा गर्भित इशारा भारतीय जनता पक्षाचे घनसावंगी विधानसभा निवडणूक प्रमुख तथा विधानसभेचे इच्छुक उमेदवार समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड चे अध्यक्ष सतीश घाटगे यांनी दिला आहे. आत्तापर्यंत घनसावंगी मतदार संघात युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश टोपे आणि पूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत असलेले हिकमत उढाण यांच्यामध्ये लढती झाल्या , आणि शिवसेनेला पराभव पत्करावा लागला.

niramy

आत्तापर्यंत उद्धवशेनेत असलेले हिकमत उढाण यांनी आता शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आहे केवळ आमदार होण्यासाठी केलेला प्रवेश हा भाजपाच्या चांगल्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने देखील आता घनसावंगीवर पहिल्यांदाच दावा ठोकलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार हिकमत उडान यांनी संवाद मेळावा आयोजित केला होता. हरियाणाचे माजी आमदार निवडणूक प्रमुख गौतम गोलेच्छा यांच्या  आणि जिल्हास्तरीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज हा मेळावा पार पडला.सविस्तर बातमी पहा वरील व्हिडीओ मध्ये.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version