जालना-  रविवार दिनांक 13 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास चंदंनझीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नववर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी आज मातोश्री नगर भागामध्ये चांगलेच वातावरण तापले होते आणि रास्ता रोको ही करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या स्थानिक गुन्हा शाखेने आदित्य सुभाष जाधव वय 19 वर्ष, राहणार मातोश्री नगर चंदनझीरा, येथील तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. काल रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान तिसरीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर या आरोपीने गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला आणि त्यानंतर ती ठार झाली आहे असे समजून तिला नालीत फेकले होते. या प्रकरणी आज सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता आणि आरोपीला गोळ्या घालण्याची मागणीही केली होती .या मागणीसाठी रास्ता रोको केला होता.

nrg

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version