जालना- भर रस्त्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास मोटरसायकल आडवी लावून एक तरुण शांत हवेमध्ये गोळीबार करत असेल आणि त्याचा व्हिडिओ देखील काढत असेल तर पोलिसांचा वचक नाही असं म्हणू नका कारण कदाचित पोलिसांच्या भीतीमुळे त्याने हवेत गोळीबार केला असावा.

 

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये नूतन वसाहत भागात लहुजी चौकात झालेलं हे चित्रीकरण सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय होत आहे. पोलिसांवरील कार्यक्षमतेपेक्षा त्या तरुणाच्या हिमतीची दाद दिल्या जात आहे. त्यासोबत पोलिसांचा  धाक आहे का मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे देखील नागरिक आपापल्या पद्धतीने समजून घेत आहेत. नेहमीप्रमाणे गोळीबार झाल्यानंतर कदीम जालना पोलीस तिथे पोहोचले आणि सोनू संतोष जाधव या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी कट्टा ही जप्त केला आहे. जिथे गावठी कट्टा खुलेआम भेटू शकतो, रस्त्यावर गोळीबार होऊ शकतो  तिथे धाब्यावर आणि गल्लीबोळात खुलेआम दारू मिळणे हे कठीण आहे का?

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version