जालना- जालना शहर महानगरपालिकेच्या मालकीचा जालना शहरात एकमेव असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव मोतीबाग तलावाच्या निसर्गरम्य काठावर हा तलाव सुरू होता. परंतु काही दुर्घटना घडल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून तलावाला टाळे ठोकले होते. परंतु जालनेकरांचा रेटा, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वारंवार या संदर्भात झालेली चर्चा लक्षात घेता शासनाने जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून या तलावाच्या दुरुस्तीला निधी दिला आहे आणि या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे कामही सुरू झाले आहे.(swimming pool)

दोन महिन्यांमध्ये म्हणजेच उन्हाळ्याच्या तोंडावर हा जलतरण तलाव (स्विमिंग पूल) जालनेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा रुजू होणार आहेत. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी आणि बच्चे कंपनीला विरंगुळा म्हणून हा तलाव उपयोगात येणार आहे तसेच जालना शहराच्या वैभवात देखील या तलावामुळे भरच पडेल. यासंदर्भात जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version