जालना- एखाद्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष म्हणून बोलविल्यानंतर त्या कार्यक्रमाचे कौतुक करणे आयोजकांना प्रोत्साहन देणे हे उपस्थित मान्यवरांचं ठरलेलं असतं परंतु एखादा कार्यक्रम सामान्यांची देणंघेणं नसलेला अस्थिव्यंगांसाठी असलेला आणि खरोखरच चांगला झाला तर उत्स्फूर्तपणे पोटातून ओठावर येणारा कौतुक काही वेगळंच असतं असाच एक अनुभव पाहायला आणि ऐकायला मिळाला तो दिव्यांगांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये गुरुवार दिनांक 12 रोजी गुरु गणेश दृष्टिहीन विद्यालयाच्या प्रांगणावर दिव्यांगांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या यामध्ये 12 शाळांनी भाग घेतला होता या क्रीडा स्पर्धाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे तर उद्घाटक म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळंके , यांच्यासह जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागत गीत ,पथसंचलन, सूत्रसंचालन आणि विविध क्रीडा स्पर्धा पाहून ते म्हणाले “मी मूळचा लातूरचा आहे. त्यामुळे तिकडच्या भाषेत जर या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थ्यांना अनेक उणिवा असूनही या उणिवा दूर सारून हे विद्यार्थी पुढे जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे .सामान्य माणसांचं पुढे जाणं यात काही नवल नाही परंतु आज येथे झालेले सादरीकरण म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं झालं तर आयला इथलं सगळंच लय भारी एवढंच मी म्हणेन.” असं ते म्हणाले.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version