जालना- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या समस्या पाहता महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेची जालन्यातही शाखा सुरू झाली आहे. या शाखेची जालना जिल्हा पदाधिकारी तथा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त तहसीलदार पी.के .ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जालना जिल्ह्यातील आठही तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान आपण सेवानिवृत्त आहोत बिनकामाचे नाही, समाज आणि आप्तसकीय आपल्याकडे ज्या नजरेने बघतात ती नजर बदलून, आनंदी आणि दुसऱ्यांसाठी काही ना काहीतरी करत जगण्याची गरज आहे. त्यासाठी आपण नेहमी स्वतःला गुंतवून ठेवावे असा सूर या बैठकीतून निघाला.

सेवानिवृत्त कर्मचारी म्हटले की बिनकामाचा कर्मचारी, म्हातारा झालेला कर्मचारी, रिकामटेकडा कर्मचारी, अशा दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिले जाते .हा दृष्टिकोन मोडीत काढण्यासाठी आणि समाज उपयोगी उपक्रम राबविण्यासाठी त्याचसोबत अनेक सेवानिवृत्तांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही संघटना काम करणार आहे. या संघटनेची जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे जिल्हाध्यक्ष पी.के. ठाकूर, कार्याध्यक्ष एस. एन. नरवडे, कोषाध्यक्ष एन. वाय. दांडगे, सचिव गोविंद जोशी, यांच्यासह गणेश कावळे, किशोर मुळे, राम गायकवाड, सुरजसिंग चौधरी, यु. एन .भोसले ,एस .एस. मगरे, मोहन राठोड ,आदींचा समावेश आहे. तालुकाध्यक्षांमध्ये सोनाजी कोकाटे जालना, बाजीराव काळुंखे परतुर, अनिल पुरी भोकरदन, साहेबराव भोपळे जाफराबाद, ऋषिकेश ताडपकर बदनापूर, एस. एम. गादेवाड मंठा,एस.ए. गाडेकर अंबड आणि एस.टी. साळवे घनसावंगी यांचा समावेश आहे.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version