जालना-…तर मग युरोप सारख्या आणि अमेरिकेसारख्या प्रगतशील राष्ट्रांमध्ये कोरोनाचे थैमान का? या प्रश्नाचे उत्तर भारतात मंदिराची गरज काय असा प्रश्न विचारणाऱ्यांनी करावा आणि आत्मपरीक्षण करावे ,असा सल्ला चक्रधर स्वामी वनदेव मंदिराचे सेवक उद्धवराज प्रज्ञासागर महाराज यांनी दिला आहे . दीड वर्षाच्या कार्यकालात मंदिरांवर आणि स्वतःवर आलेले संकट आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याविषयी ते सांगत होते.

गेल्या आठ महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे या मंदिरामध्ये भाविकच आले नाहीत, आणि पर्यायाने उत्पन्न झाले नाही.

मात्र व्यवस्थापनाने त्यांच्याकडे असलेल्या जमापुंजी मधून आत्तापर्यंत सर्वकाही सुरळीत चालू ठेवले आहे .त्याच वेळी या मंदिराचे सेवेकरी, स्वतः भिक्षेकरी आहेत.

 

असे असताना गावोगावी फिरून नागरिकांचे मानसिक आत्मबल वाढविण्याचे काम केले आहे. खरे तर अशा परिस्थितीमध्ये या त्रासदायक महामारी मध्ये अनेक जण खचले होते .त्यांना मानसिक बळ देण्याचे काम देखील त्यांनी केलं आहे.मंदिरातही उत्पन्न नाही अशा परिस्थितीमध्ये हा डोलारा चालायचा कसा? हा मोठा प्रश्न आहे. बाकी इतर गोष्टी शासनाने सुरू केल्या आहेत तशाच पद्धतीने मंदिरे देखील 50% का होईना सुरू करावीत ,जेणेकरून उत्पन्नाचे साधन सुरू होईल. त्याच सोबत मंदिरांना आर्थिक बाबतीत जरी मदत करता नाही आली तरी किमान वीज बिलात तरी सवलत द्यावी अशी मागणीही उद्धवराज प्रज्ञासागर महाराज यांनी केली आहे .दरम्यान मागील वर्षी मंदिरांची गरज काय? हॉस्पिटलची गरज आहे! असा एक प्रवाह वाहत होता .याबद्दल  प्रश्न विचारणाऱ्यांना महाराजांनी चांगलीच चपराक दिली आहे .मंदिरांपेक्षा हॉस्पिटलची जर गरज असेल तर युरोप आणि अमेरिकेसारख्या प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेल्या राष्ट्रांमध्ये देखील या आजारामुळे हाहाकार उडाला होता तो कसा? याउलट भारत प्रगतशील नसतानाही कोरोना सारख्या महामारीवर सक्षम पणे मात केली आहे आणि ही मात केवळ भारतीयांनी आत्मबलाने केलेली आहे. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला,  ज्यांनी असे मंदिर नको असे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांनी युरोप आणि अमेरिकेत महामारी चा परिणाम का झाला? याचे आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ताज्या आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी डाउनलोड करा edtv jalna app,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version