जालना- जालना शहरात औद्योगिक वसाहत भागातील टप्पा क्रमांक तीन मध्ये असलेल्या एका कंपनीत दिनांक 19 ऑक्टोबर रोजी खंडणीवरून एका तरुणाला चाकू आणि लाट्या काठ्याने मारहाण केली होती .या घटनेतील चार आरोपींना यापूर्वीच अटक केले आहे तर उर्वरित दोन आरोपींना शुक्रवार दिनांक 20 रोजी अटक केली आहे.  आणखी तीन आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. या आरोपींनी खंडणीवरून एका तरुणाला मारहाण केली होती त्याचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर तपासाची चक्रे गतिमान करत चार जणांना अटक केली होती. मात्र अद्याप पर्यंत काही फरारच होते.

19 ऑक्टोबरला औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या रूट पाईप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये खादगाव गावातील काही तरुण सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गेले आणि कंपनी व्यवस्थापनाला “जर कंपनी चालवायची असेल तर येथील कॅन्टीन आम्हाला द्यावी लागेल किंवा दोन लाख रुपये दरमहा खंडणी”अशी  मागणी केली याच दरम्यान कंपनीमधून मुलाखत देऊन बाहेर येत असलेल्या एका तरुणाला या  आरोपींनी चाकू लाट्याकठ्याने मारहाण केली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित करण्यात आला होता. या प्रकरणा नंतर कंपनीतील कर्मचारी दानेश्वर क्षत्रियुगी प्रसाद पांडे वय 40 वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खादगाव येथील लखन घोरपडे, पप्पू घोरपडे, नवनाथ नाईकवाडे, साईनाथ हिवाळे, राहुल हिवाळे ,अरुण घोरपडे, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी तथा परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती करिश्मा चौधरी यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण ,पोलीस कर्मचारी प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवी देशमुख, राजू पवार, अभिजीत वायकोस, नवनाथ पाटील, दीपक देहंगल यांनी शुक्रवार दिनांक वीस रोजी पवन शंकरपिल्लालू राहणार म्हाडा कॉलनी जालना, आणि नंदू अशोक भानुसे राहणार शिवनगर जालना या दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 23 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version