जालना-“प्रवचन नाही तर प्रयोग” हे ब्रीदवाक्य घेऊन दिनांक 25 पासून जालन्यामध्ये “सन टू ह्यूमन “(sun to human)हे एक जीवन जगण्यासाठी नवीन दृष्टिकोन देणारे पाच दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे .नवीन जालना भागात असलेल्या श्रीमती दानकुवर महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर सकाळी सात वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहे. सबका मंगल होय रे असोसिएशनने या शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर सर्वांसाठी निशुल्क आहे. इंदोर येथील परम आलयजी हे या शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. आयुष्यामध्ये सम्यक आहार ,सम्यक व्यायाम आणि सम्यक ध्यान याचं काय महत्त्व आहे आणि यामुळे आपले जीवन कसे समृद्ध होईल याविषयी या शिबिरातून मार्गदर्शन केले आहे. आयोजकांनी सुमारे 5000 शिबिरार्थी यांची व्यवस्था केली आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version