जालना-स्पर्धा पूर्वीही होत्या आजही आहेत. परंतु आताच्या स्पर्धा या जीवघेण्या आहेत .त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजूबाजूचे लोक काय म्हणतील? याचा विचार न करता आत्मविश्वास बाळगावा .असा सल्ला जालना जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत यांनी दिला आहे.

ब्रम्हास्त्र ग्रुप जालना, यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांनी पालकांसाठी कौशल्य विकास व करियर मार्गदर्शन शिबिरात विपुल भागवत हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून घनसावंगी चे गटशिक्षणाधिकारी रवी जोशी ,डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पुण्याचे सेवानिवृत्त प्राचार्य ए. व्ही. कुलकर्णी संभाजीनगर येथील जे. एन. इ. सी चे प्रा. डॉ. गिरीश बसोले ,जालना सांख्यिकी विभागाचे उपसंचालक सूचित कुलकर्णी, योग प्रशिक्षक डॉ. मकरंद बोठे यांची उपस्थिती होती.

जुना जालना भागातील ब्राह्मण सभेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात बोलताना श्री. भागवत पुढे म्हणाले की, “या जीवघेण्या स्पर्धेमध्ये सर्वच बाजूंनी यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी महत्त्वाचे आहे ते नियोजन. मोठ्या ध्येयाच्या दिशेने जाणारा मार्ग तपासणे ,त्याविषयीची माहिती गोळा करणे आणि त्या दिशेने पाऊल टाकत जाणे हे महत्त्वाचे आहे. अनेक वेळा आपण आजूबाजूचे लोक काय म्हणतील? असे म्हणत आत्मविश्वास गमावून बसतो. परंतु आपल्या बोलण्यात जर स्पष्टता आणि आत्मविश्वास असेल तर एखाद्या वेळी आपली चूकही समोरच्याच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आत्मविश्वास हा महत्त्वाचाआहे” असेही ते म्हणाले. यावेळी सर्व मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल हेलसकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रमोद नाईक यांनी केले.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version