जालना-पुणे येथील महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील “अमृत” संस्थेच्या लक्षीत गटातील उमेदवारांसाठी मोफत सोलर पॅनल इंस्टॉलेशनवर आधारीत निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे दि.7 ते 24 जानेवारी 2025 या अठरा दिवसाच्या कालावधीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांना तांत्रिक व उद्योजकीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सध्या ऊर्जेचा तुटवडा भासत असल्यामुळे शासनाचे धोरण सोलर ऊर्जा निर्मितीला प्राधान्य देण्याचे आहे. त्यामुळे सोलर ऊर्जा निर्मिती साठी शासनाच्या वतीने सबसिडीच्या दरामध्ये शेतकरी तसेच लाभार्थ्यांना सोलर पॅनल देण्यात येत आहेत. परंतु सदरील पॅनल इन्स्टॉलेशन मेंटेनन्स, दुरुस्ती करणारे मनुष्यबळ जालना जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योग करण्याची संधी या प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध होणार असून प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींची निवड प्रत्यक्ष मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. तसेच जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षण हे खुल्या प्रवर्गातील “अमृत” लक्षित गटातील उमेदवारांसाठी म्हणजे (ब्राह्मण बनिया, वत्स, कम्मा, कायस्त, नायर, एयांगर, पाटीदार, बंगाली, पटेल, मारवाडी, यलमार, त्यागी, ठाकूर, मारवाडी, सेनगुनथर, सिंधी, राजपुरोहित, नायडू, यलमार ) इत्यादी प्रवर्गातील लाभार्थीना सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे सहभागी होता येईल.(www.edtvjalna.com)
प्रवेशासाठी पात्रता शिक्षण किमान बारावी पास, पदवीधर व तांत्रिक पदवीधारकास प्राधान्य असून वयोमर्यादा 21 ते 50 वर्ष आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांना प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्जासोबत शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, तहसीलचे अधिवास प्रमाणपत्र, जातीचा उल्लेख असलेल्या कोणत्याही शासकीय कागदपत्राचा पुरावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्याचे तहसील उत्पन्न दाखला, विवाहित असल्यास महिलांसाठी गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड आदि प्रवेश अर्जासोबत छायांकित प्रतिमध्ये जोडणे आवश्यक आहे. www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर आपला अर्ज अपलोड करून, अर्जाची हार्ड कॉपी व अर्जासोबत आवश्यक कागदपत्राच्य छायांकित प्रती जोडून जिल्ह्यातील जिल्हा प्रकल्प अधिकारी या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये सादर करण्याची अंतिम दि. 1 जानेवारी 2025 आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित जिल्ह्याच्या प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी), द्वारा मराठा पार्क बिल्डींग विशाल कॉनर छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना फोन नं. ०२४८२- २२०५९२ या ठिकाणी संपर्क साधावा व आपला प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.——–
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता. -दिलीप पोहनेरकर-9422219172
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com