जालना- आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यात वडीगोद्री जवळ असलेल्या महाकाळा येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ठार झालेले प्रवासी ही छत्रपती संभाजीनगर येथील आहेत.

महाकाळा गावाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला बीड कडून संभाजीनगर कडे जाणारी चार चाकी क्रमांक एम एच 20 सी एस 60 41 ही पाठीमागून धडकली. या अपघातामध्ये अनिता परशुराम कुंटे वय 48 ,भागवत यशवंत चौरे वय 47 ,सृष्टी भागवत चौरे वय 13 आणि वेदांत भागवत चौरे वय 11 हे जागीच ठार झाले आहे तर चार चाकी चालवत असलेले चालक परशुराम लक्ष्मण कुंटे वय 55 आणि छाया भागवत चौरे वय 40 हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत .महामार्ग पोलिसांना फारुख मन्सूर पठाण राहणार ढाकलगाव यांनी माहिती दिली होती. त्यानुसार गोंदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  श्री .खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक शेख , महामार्ग पोलिसांचे प्रभारी अधिकारी आर. के. निकम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री आढाव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई केली.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version