जालना- दिवसेंदिवस शहरी भागातील नागरिकांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ तुटायला लागली आहे. त्यामुळे निसर्गाचा ठेवा आणि निसर्गाच्या सानिध्यातला आनंद  जर लुटायचं असेल तर ग्रामीण भागात गेल्याशिवाय पर्याय नाही . त्यासाठी काहीतरी निमित्त हवं !सध्या हुरड्याचे दिवस आहेत आणि ग्रामीण भागांमध्ये शेतातील आळींमध्ये भाजलेल्या गरम हुरड्यावर ताव मारण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. परंतु फक्त हुरडा खाण्यासाठी अनेक जण जाण्याचे टाळतात  ते परवडतही नाही किंवा तेवढ्यासाठी दिवस घालवणे शक्य होत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी या हुरडा पार्टीला वेगळं स्वरूप दिलं आहे किंवा हुरडा पार्टीचा शेतीला जोड धंदा म्हणून व्यवसाय सुरू केला आहे .या व्यवसायातून उत्पन्न तर वाढतेच परंतु नागरिकांचा हुरडा खाण्यासाठी येण्याचा कलही वाढतो.  तिथे आल्यानंतर दिवसभरासाठी घरदार विसरून आनंद लुटतात. अर्थातच हा आनंद काही मोफत मिळत नाही. परंतु मिळालेल्या आनंदाची किंमतही करता येत नाही .असंच एक ठिकाण सध्या चर्चिल जात आहे ते म्हणजे “गोकुळ हुरडा पार्टी”.

nirnay hospital

एका तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या आणि तरुणाईला आकर्षित करणारे थरारक खेळ ठेवून या हुरडा पार्टीचं आकर्षण निर्माण केला आहे. ज्याला उंट घोडा बैलगाडीची आवड आहे, ज्याला पाण्यामध्ये भिजायला आवडतं ज्याला चित्त थरारक खेळ खेळायला आवडतात, ज्याला बोटिंग करायला आवडतं, ज्या चिल्लर पार्टीला रेल्वेची अनुभूती घेण्यासाठी शेतीमधून चक्कर मारायला आवडते आणि ज्यांना आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील अशा सर्वांसाठीच हे ठिकाण आहे.  शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सुरू केला आहे. जालना सिंदखेड राजा रस्त्यावर जालना पासून आठ किलोमीटर अंतरावर माळाचा गणपती आहे आणि या गणपतीच्या पायथ्याशी म्हणजे नंदापूर गावच्या शिवारात सध्या हुरडा पार्टीचे कार्यक्रम रंगत आहेत. दिवसभरामध्ये कितीही खा ,कितीही खेळा ,पाहिजे ते खा, पोटाची काळजी आणि चवदार जेवणासाठी चुलीवरचे जेवण जेवा. असा इथे उपक्रम चालतो आणि दिलेल्या पैशाची वसुली होते. जर तुम्हालाही हा आनंद लुटायचा असेल तर 9423121863 वर तुम्ही जाणार असल्याची पूर्व सूचना द्या. कारण तुम्ही येणार म्हणजे तुमच्यासाठी कोवळा, लुसलुशीत हिरवा हुरडा तयार ठेवावा लागेल, दह्याची व्यवस्था करावी लागेल, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ही कराव्या लागतील, खेळ तर तयारच आहेत.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version