जालना- गेल्या अनेक महिन्यांपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड येथील या आर्थिक संस्थेच्या विविध ठिकाणी असलेल्या शाखांमध्ये अपहार झाल्याचे उघडतेस आले आहे आणि हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक ही झाली आहे अशीच फसवणूक अंबड तालुक्यातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या झिरपी येथील लक्ष्मण भीमराव सावंत यांची झाली होती जास्तीचा व्याजदर देऊन त्यांच्याकडून आर्थिक गुंतवणूक करून घेतली आणि ती परत दिलीच नाही त्यामुळे लक्ष्मण सावंत यांनी दिनांक 16 जून 2024 रोजी अंबड पोलीस ठाण्यात 21 लाख 91 हजार 167 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंद केली होती ही तक्रार आरोपी सुरेश ज्ञानोबा कुठे वय 48 वर्ष राहणार कुठे वाडी तालुका जिल्हा बीड आशिष दामोदर पाटोदकर वय 32 वर्षे राहणार पाटोदा जिल्हा धाराशिव यशवंत वसंतराव कुलकर्णी वय 54 वर्ष राहणार कवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड आणि वैभव यशवंत कुलकर्णी वय पंचवीस वर्षे राहणार कवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड अशा चौघांच्या विरोधात ही तक्रार होती त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास जालनायक आर्थिक गुण शाखेकडे आला आणि या गुन्ह्याच्या अनुषंगानेच इतरही 747 गुंतवणूकदारांनी आपली ही फसवणूक झाली आहे अशा आशयाची तक्रार केली होती एकूण 39 कोटी 58 लाख 99 हजार 711 रुपयांचा हा अपहार झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली.

खरंतर ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुठे यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत जालन्याच्या आर्थिक गुणशाखेने देखील यापूर्वी त्यांना जालना येथे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासासाठी आणले होते परंतु आज फक्त अंबड येथे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या बीड कारागृहातून बीड न्यायालयाच्या परवानगीने तपासासाठी जाणण्यात आणले आहेत तत्पूर्वी अंबड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्यामुळे या चारही आरोपींना आधी अंबड न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाला चौकशीसाठी सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे रात्री उशिरा या चारही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून आर्थिक गुणशाखेने या चारही जणांना ताब्यात घेतले आहे.

आरोपींना  आणण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधीक्षक श्री. राठोड यांच्यासह तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्यासह  समाधान तेलंग्रे, गोकुळसिंग कायटे, चंद्रशेखर मांटे, रवी गायकवाड, गजू भोसले, फुलचंद घुसिंगे, निमा घनघाव, मंदा नाटकर, जया निकम, रामसिंग चव्हाण हे सर्वजण या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फसवणुकी संदर्भात तपास कामी कार्यरत आहेत.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version