अंबड- घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील एका ग्रामस्थांच्या मुलाच्या जात प्रमाणपत्रासाठी दोन हजारांची लाच घेताना पकडलेल्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांच्या बॅगमध्ये एक लाख 67 हजार पाचशे रुपये निघाले.

शिंदे वडगाव येथील एका ग्रामस्थांच्या मुलाचे जात प्रमाणपत्र काढायचे होते. त्यानुसार या ग्रामस्थाने 13 सप्टेंबर 2023 रोजी ऑनलाइन पद्धतीने 57 रुपये फी देखील भरली होती. परंतु दीड वर्ष होऊनही प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्याने अंबड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी देवानंद कारभारी डोईफोडे वय 37 याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी हे प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी देवानंद डोईफोडे यांनी केली. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने आज दिनांक 31 जानेवारीला लाचलुचपत विभागाच्या अंबड येथील पथकाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन पडताळणी केली असता तक्रारीत सत्यता आढळली आणि त्यानंतर सापळा रचण्यात आला .या सापळ्यामध्ये देवानंद डोईफोडे यांनी दोन हजार रुपयांची रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारली. दरम्यान या लाचेव्यतिरिक्त त्यांच्याजवळ दहा हजार 265 रुपये आणि बॅगेत एक लाख 67 हजार पाचशे रुपये रोख रक्कम सापडली. या रोख रक्कम बद्दल समाधानकारक खुलासा डोईफोडे करू शकले नाहीत. अशी एकूण एक लाख 77 हजार 765 रुपये लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. दरम्यान देवानंद डोईफोडे यांच्या घराची झडती घेतली असता कुठलेही आक्षेपार्य कागद सापडले नाहीत.

www.edtvjalna.com, Dilip Pohnerkar,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version