जालना- गुंतवणुकीवर जास्तीचे व्याजदर देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे दरम्यान पोलीस कोठडीत असताना जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासामध्ये कोट्यावधींची मालमत्ता शोधली आहे आणि ती जप्तीची कारवाई देखील सुरू करण्यात आले आहे.

अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सुरेश कुटे आणि त्याच्या इतर चार सहकाऱ्यांना दिनांक 28 जानेवारीला जालन्यात आणले होते. अंबड न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना एक फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती .या तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कुटे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मालमत्तेचा शोध घेतला असता मुंबई आणि सोलापूर येथे चार मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी देखील केली .या मालमत्तेमध्ये सोलापूर येथे अर्धवट बांधकाम केलेले एक घर आहे जे आशिष पाटोदेकर च्या नावावर आहे, तसेच नवी मुंबई येथे देखील तीन कार्यालय आहेत जे सुरेश कुटे च्या नावावर आहेत. 2014 ते 2020 च्या दरम्यान खरेदी केलेली ही मालमत्ता आहे आणि शासकीय मूल्यांकनानुसार  त्याची किंमत 14 कोटी 49 लाख रुपये  होत आहे.ती आजच्या बाजार मूल्यानुसार कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे. ही सर्व मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक श्री. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे,त्यांचे सहकारी समाधान तेलंग्रे,रवी गायकवाड,आरोपी सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर यांनी स्वतः मालमत्तेच्या ठिकाणी जाऊन ती निष्पन्न केली आहे. दरम्यान एक तारखेला पोलीस कोठडीची मुदत संपणार होती. त्यामुळे पुन्हा अंबड न्यायालयात या चौघांनाही हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ करून ती आता 5 फेब्रुवारी पर्यंत सुनावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातील गोकुळसिंग कायटे, चंद्रशेखर मांटे,  गजू भोसले, फुलचंद घुसिंगे, निमा घनघाव, मंदा नाटकर, जया निकम, रामसिंग चव्हाण हे सर्वजण या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फसवणुकी संदर्भात तपास कामी कार्यरत आहेत.

आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version