जालना -जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एक फेब्रुवारीला जिल्हा नियोजन व विकास समितीची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावित केलेल्या निर्णयावर जालन्यात आता तीव्र पडसाद उमटायला लागले आहेत. दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेमध्ये श्रीमती मुंडे म्हणाल्या होत्या की” शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी मराठवाड्यातील चार  जिल्ह्यांमध्ये शेळ्या मेंढ्यांचे कत्तलखाने सुरू करण्याचा विचार आहे. जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांना यापासून उत्पन्न मिळेल, तसेच जालना शहरात सुरू होत असलेल्या ड्रायपोर्टमुळे कत्तलखाण्याचा व्यवसाय वाढवून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. हा निर्णय प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्यानंतर याचे सर्वच स्तरातून तीव्र पडसा द्यायला लागले आहेत.

जालना जिल्ह्यामध्ये अहिंसेची शिकवण देणारा जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे. एवढेच नव्हे तर जैन समाजाचे महान तपस्वी श्री गणेशलालजी म.सा. यांचे इथे समाधीस्थान आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यातूनही अनेक भाविक इथे दर्शनाला येतात. रामदास स्वामींची जन्मभूमी असलेल्या जांब समर्थ देखील याच जिल्ह्यात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पदस्पर्शाने नव्हे तर त्यांच्या उपस्थितीमध्ये पुरातन राम मंदिर देखील जालना शहरातच उभारला गेलं आहे . मराठवाड्यात सर्वात जास्त गोशाळा या जालना जिल्ह्यात आहेत. जालना जिल्हा ही अनेक संतांची जन्मभूमी आहे. जालना जिल्ह्याचा आराध्य दैवत असलेल्या आणि पंढरपूरचे प्रतीक पांडुरंग म्हणून आनंदी स्वामी महाराजांचा मठ देखील जालना शहरातच. देवदैवतांचा तर विषयच नाही. अशा या पावनभूमीमध्ये शेळ्या- मेंढ्यांची कत्तल होणे ही संताप जनक बाब समोर यायला लागलीआहे. त्यामुळे या सर्व गोष्टीला विरोध करण्यासाठी आज सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना या कत्तलखाण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी हे निवेदन स्वीकारले.

दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई येथील समस्त महाजन ट्रस्ट पर्यावरण जतन, संवर्धन करत आहे. नद्या- नाल्यांची रुंदी, खोली वाढवणे, त्यांची स्वच्छता करणे ,शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करून देणे, जलसाठ्यांची देखभाल दुरुस्ती करणे. या सर्व कामांमध्ये सध्या समस्त महाजन ट्रस्ट अग्रेसर आहे .या ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई यांनी देखील या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर भविष्यात कुठल्याही स्तरावर जाऊन हा निर्णय थांबवणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. हिंदू महासभा तर अशा विषयांमध्ये नेहमीच आक्रमक असते या महासभेचे पदाधिकारी धनसिंग सूर्यवंशी यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना थेट भावनिक आवाहन करून जालना शहरात सध्या सुरू असलेले उघड उघड मटणाची दुकाने ही का कमी आहेत का? असे म्हणत कत्तलखाना जर झाला तर आंदोलन छेडण्याचा ही इशारा दिला आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version