जालना- महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी फक्त ही पोलिसांचीच चालेल याची दक्षता घ्या! अशी तंबी राज्याचे महसूल, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज जालनाच्या पोलीस अधीक्षकांना दिली.  छत्रपती संभाजीनगर “विभागीय महसूल सांस्कृतिक स्पर्धा 2025 “च्या उद्घाटनासाठी ते आज जालन्यात आले होते. दरम्यान, मी कधीही कोणत्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी शिफारस केलेली नाही, कोणाची बदली ही केलेली नाही, कोणाला वशिलाही सांगितलेला नाही परंतु आदरयुक्त भीती मात्र वाटली पाहिजे या हेतूने मी नेहमीच महसूल कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. आज महसूल कर्मचाऱ्यांनी वाळू माफिया संदर्भात केलेल्या तक्रारी गंभीर आहेत. आणि त्यांना पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे ते हतबल झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये मी त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे.  पोलीस अधीक्षकांनी देखील योग्य  ती कारवाई करावी, मग तो कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो ,त्याची गय करू नये असे आवाहन देखील योगेश कदम यांनी केले आहे.

जालन्यात आज पासून छत्रपती संभाजी नगर विभागाच्या महसूल व सांस्कृतिक स्पर्धा 2025 ला प्रारंभ झाला आहे. यावेळी व्यासपीठावर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर ,बदनापूर चे आमदार नारायण कुचे ,यांच्यासह विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि इतर जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान उपस्थिततांना मार्गदर्शन करताना विभागीय आयुक्तश्री. गावडे यांनी देखील आपली भूमिका स्पष्टच मांडली. मानसिक दृष्ट्या खेळाची खूप मोठी गरज आहे परंतु ते खेळत असताना हार – जित यासाठी भांडणे करायची गरज नाही, आणि जरी केलीस तरी गेल्या 40 ते 45 वर्षांपासून भांडणारे राजकारणी कसे एकत्र नांदतात याकडे देखील आपण पाहिले  आणि त्यांच्यापासून एकत्र कसं राहायचं याचा बोध घेतला पाहिजे असेही श्री. गावडे यांनी सांगितले.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version