जालना- तुम्हाला अनिल कपूरचा “नायक” चित्रपट आठवत असेल. ज्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री केल्यानंतर तो सर्व कार्यालय सोबतच घेऊन फिरतो आणि धडाधड निर्णय घेतो. तशीच काही परिस्थिती आज नवीन मोंढा भागात पाहायला मिळाली.

परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक   चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी श्रीमती करिश्मा चौधरी यांनी काही दिवसांपासून नवीन मोंढा भागात  खबऱ्यांना पाठवून कुठल्या दुकानात  सुगंधितआणि  बंदी असलेला जर्दा विकला जातो याची माहिती घेतली होती. त्या अनुषंगाने आज सकाळीच श्रीमती चौधरी या आपल्या ताफ्यासह नवीन मोंढ्या मध्ये पोहोचल्या. पहिली कारवाई केली ती खेरुडकर कंपनी ट्रेडर्स वर इथे होत असलेली कारवाई पाहून त्याच्या समोरच असलेल्या रॉयल ट्रेडर्स चा मालक पळून गेला .परंतु चौधरी यांनी आज कारवाईचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे त्या संबंधित दुकानाला वारंवार फोन करूनही तो न आल्यामुळे सोबत ॲपे रिक्षामध्ये असलेल्या  गॅस कटरने पंचा समक्ष या रॉयल ट्रेडर्सचे कुलूप तोडले आणि कारवाई केली.

या कारवाईमध्ये सापडलेला सुगंधित जर्दा देखील त्यांनी सोबत आणलेल्या ट्रक मध्ये भरला  आहे. या दोन कारवाया होत असतानाच जवळच असलेल्या मोहन एजन्सीच्या मालकाला याची भनक लागली आणि त्यांनी आज दुकानच उघडले नाही. कदाचित तो कारवाईच्या भीतीने दुकान उघडून दुकानातील माल इतरत्र हलवेल अशी देखील परिस्थिती निर्माण होऊ शकते हे लक्षात घेऊन या दुकानाच्या बाहेर दोन गृहरक्षक दलाचे जवानही तैनात करण्यात आले होते. त्यामुळे पहिली कारवाई खेरुडकर कंपनी ट्रेडर्स दुसरी कारवाई रॉयल ट्रेडर्स आणि तिसरी कारवाई होती ती मोहन एजन्सीवर .मोहन एजन्सी समोर हा सर्व ताफा जाऊन भिडल्यानंतर दुकान तर बंदच होतेच. मालकाला फोन लावल्यानंतर त्याने मी प्रयागराजला असल्याचे सांगितले आणि किल्ल्या देण्यास टाळाटाळ केली .परंतु ज्यावेळी किल्ली न मिळाल्यास गॅस कटरने कुलूप तोडण्यात येईल असे सांगितले त्यावेळेस इतरांच्या सहाय्याने त्याने किल्ली पाठवून दिली. त्यामुळे इथे गॅस कटरचा वापर करण्याचे काम पडले नाही. एकंदरीत आज तिन्ही ठिकाणी हे छापे मारण्यात आले आणि सर्व तयारीनिशी पोलीस यंत्रणा गेली होती त्यामुळे हे छापे मारणे यशस्वी झाले आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version