जालना- धनगर समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे आणि त्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रवाहात टिकून राहता यावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वस्तीगृहात राहणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 70 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केलेले आहे. त्यानुसार आजही जिल्ह्यातील 39 शाळांमधून अशा प्रकारचे अनुदान विद्यार्थ्यांच्या नावावर उचलल्या जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र हे विद्यार्थी या शाळेतील वसतिगृहात आहेत ? याची खातरजमा मात्र कोणीच करत नाही.

उलट धनगर समाजाच्या पालकांना तुमच्या मुलांना मोफत शिकवतो, त्यांना गणवेश घेतो अशा वेगवेगळे प्रकारची आमिषे दाखवून शाळेमध्ये भरती केल्या जाते. आणि त्यांच्याकडून कधी स्टेशनरीच्या नावाखाली तर कधी परीक्षा फी च्या नावाखाली फी घेतल्या जाते. बहुतांश धनगर समाजातील पालकांना आपल्या मुलांसाठी शासन अनुदान देते हेच माहीत नाही. त्यामुळे अनेक जण या अनुदानापासून वंचित आहेत. धनगर समाजासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही बातमी आहे परंतु या बातमीमुळे ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये असे वसतिगृह त्यांची झोपही उडाल्याशिवाय राहणार नाही. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हा सर्व खेळ चालतो.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version