जालना- वाळू माफियांमुळे गेल्या महिन्याभरात जालना जिल्ह्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे सर्वच स्तरातून पोलीस प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागला. तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील पोलीस अधीक्षकांची या संदर्भात कानउघडणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी कारवाया केल्या.
त्यासोबत आज अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी उपाधीक्षक करिष्मा चौधरी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, यांच्यासह जालन्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी वाळूमाफीयांची परेड घेतली. पोलीस अधीक्षक कार्यालयात जालना आणि भोकरदन विभागातील वाळू माफियांना बोलावून नोटीस बजावले आहे ही नोटीस बजावत असताना अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य लोकांनी यांनी या माफीयांना सज्जड दमच दिला आहे आता तुम्ही पोलिसांच्या रडारवर आहात आता सुधारणा करा आणि इतर दुसरे काम धंदे बघा यापुढे जर गुन्हेगारीशी संबंधित काम कराल तर हद्दपारिशीन कारवाई केली जाईल असा दम आयुष लोकांनी यांनी भरला आहे भोकरदन जालना उपविभागानंतर आता परतुर आंबड उपयोगाची झाडाझडती होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.