जालना- जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल राजू गायकवाड धुपे यांच्या तोंडाला काळे फासण्याची धमकी देणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात कधी जालना पोलीस ठाण्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान यासंदर्भात शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल तुपे यांनी कधी जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की शुक्रवार दिनांक 27 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथील शिक्षक जगन विठोबा वाघमोडे आणि इतर पाच सहा जण जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात येऊन शिक्षण अधिकाऱ्यांसोबत एकेरी भाषा वापरू लागले त्यानुसार तक्रारीत म्हटले आहे की तू शिक्षणाधिकारी आहेस त्याच्याशी मला काही देणे घेणे नाही तू कार्यालयाच्या खाली उतर तुला पाहून घेतो तो ऑफिस मधून घरी कशी जाते ते बघतो तसेच तुझ्या तोंडाला काळे ही भासतो असे बोलून मोठ्या आवाजात अरेरावीची भाषा जगन वाघमोडे हे करीत होते त्याचवेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या मकरंद शेवलीकर आणि प्रसन्न कुमार जोगदंड यांनी या आरोपींना कार्यालयाच्या बाहेर काढले.
दरम्यान या संदर्भात आपली बाजू मांडताना जगन विठोबा वाघमोडे म्हणाले की ,दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय जालना येथे मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलो असता माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला धुपे गायकवाड या हजर नव्हत्या. त्यावेळी कार्यालयीन अधीक्षक तथा प्रभारी वेतन अधीक्षक मकरंद सेवलीकर हे हजर होते. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत व्यवस्थित चर्चा केली ,परंतु ज्या वेळेस माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आल्या त्यावेळेस आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी गेलो. आम्ही चर्चा करत असतानाच त्यांनी मोठमोठ्या आवाजात मला धमकावले .म्हणाल्या तुम्ही माझ्या विरोधात बातम्या देता ,माझी बदनामी करता ,एकटा जगन वाघमोडे माझी बदनामी करत असतो, वर्तमानपत्रात माझ्या विरोधात बातम्या देत असतो आणि स्टेटस ठेवत असतो .या कारणाने माझ्या अंगावर त्या धावून आल्या व मलाच अरेरावीची भाषा वापरली. आमच्या सोबतही महिला शिक्षिका असतात, त्यांनी त्यांना आवरले. शिक्षकांना होणाऱ्या समस्यांसंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला की त्या सुडाची भावना मनात ठेवून इतर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असतात .या विरोधातच आम्ही त्यांना बोलण्यासाठी गेलो असता त्यांनी अशी भाषा वापरली व गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली .
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172 आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com