जालना – जालना जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आज दिनांक 28 पासून महिला बचत गटांच्या “जानकी महोत्सव 2025” या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी भोकरदन चे आ. संतोष दानवे यांच्यासह विभागीय उपायुक्त श्री. बेदमुथा, जालना जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती कोमल कोरे,ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कार्यकारी अभियंता श्रीमती मंजुषा कानडे, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हाप्रमुख शैलेश चौधरी आदींची यावेळी उपस्थिती होती.

मराठवाड्यातील उमेदअंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांचे हे प्रदर्शन आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळावे, त्यासोबत शहरी भाग आणि ग्रामीण भागाची नाळ जोडलेली राहावी. या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे . 6 मार्च पर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनामध्ये खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविले जाणार आहेत .अस्सल गावरान पद्धतीचे कपड्यावर थापलेले धपाटे-दही ,ओल्या शेंगदाण्याचा आणि मिरचीचा ठेचा, धिरडे, थालीपीठ, बाजरीची भाकरी,  त्यासोबतच गावरान पद्धतीचा मांसाहार देखील इथे उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःने केलेल्या कुरडई, पापडी, लोणचे, विविध प्रकारच्या डाळी असं सर्व रसायन विरहित घरासाठी लागणारे साहित्य देखील इथे उपलब्ध आहे, खाण्यापिण्याच्या साहित्यासोबतच गृह सजावटीसाठी आवश्यक असणारी तोरणे ,अगरबत्ती, घोंगडी, सारख्या अनेक वस्तू या प्रदर्शनात आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योगाला चालना देऊन त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version