जालना- जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये लोखंडी सळ्यांची निर्मिती करणारे अनेक कारखाने आहेत .या कारखान्यांमध्ये लोखंडाचे भंगार साहित्य खरेदी केले जाते. परंतु आता तर चक्क रेल्वेचे तुकडे पाडलेले रुळच चोरीच्या मार्गाने विकायला यायला लागले आहेत .त्यामुळे जालना औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांना हे रूळ पुरवणारे रॅकेट असल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अकोला येथून रेल्वे पटरी चे पाच ते सहा फुटांचे शेकडो तुकडे घेऊन येणारा ट्रक आज रेल्वे पोलिसांनी पकडला आहे. दरम्यान हा ट्रक देखील जालन्याचाच आहे. या संदर्भात दोन आरोपींना ताब्यात घेतल्या असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.