जालना- अंबड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यु. डी .राजपूत यांची पदोन्नती झाली आहे . पदोन्नती सोबतच त्यांची बदली ही झाली आहे. जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून ते आता येणार आहेत. दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी जालना जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हजर झालेले ए. आर. चव्हाण यांची जागा ते घेणार आहेत .दरम्यान ए .आर. चव्हाण यांची बदली कुठे झाली हे मात्र आदेशामध्ये नमूद केलेले नाही.

महाराष्ट्र राज्य सेवा गट मधील गटविकास अधिकारी (S-20) संवर्गातील अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (S-23)अंतर्गत तात्पुरती पदोन्नती देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत .या विभागाच्या आवर सचिव डॉ. उर्मिला जोशी यांनी दिनांक 24 रोजी हे आदेश काढले . बहुतांश अधिकारी हे तीन- तीन वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असतात परंतु अंकुश चव्हाण यांची अवघ्या दीड वर्षातच बदली करण्यात आली आहे. दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी परभणी जिल्हा परिषदेतून अंकुश चव्हाण आणि त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजेंद्र तुबाकले हे दोघेही जालना जिल्हा परिषदेमध्ये हजर झाले होते.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version