Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » लिफ्ट दिली एकीला गळ्यात पडल्या दोघी आणि लागला साडेतीन लाखांचा “आयुर्वेदिक” चुना!
    Breaking News

    लिफ्ट दिली एकीला गळ्यात पडल्या दोघी आणि लागला साडेतीन लाखांचा “आयुर्वेदिक” चुना!

    EdTvBy EdTv17/04/2025Updated:17/04/2025No Comments3 Mins Read22 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- कधीकधी माणुसकीच्या भावनेतून लिफ्ट देणेदेखील चांगलेच महागात पडते. अनेक वेळा असंही होतं की या लिफ्टच्या माध्यमातून मैत्री वाढते आणि मग ती कधी अंगलट येते. प्रकार कोणताही असो परंतु जिथे इज्जतीचा प्रश्न येतो तिथे माणूस घाबरून जातो. त्यातूनच एका 56 वर्षीय शिक्षकाला लिफ्टच्या माध्यमातून गळ्यात पडलेल्या प्रकरणामुळे सुमारे साडेतीन लाखाचा चुना लागला होता परंतु पोलिसांच्या वेळीच सतर्कतेमुळे टळला आहे.

    जालना शहरातील अंबड चौफुलीहून अंबड कडे जाणाऱ्या इंदेवाडी च्या पाणी टाकीजवळ जगन्नाथ पांडुरंग नागरे वय 56 वर्षे राहणार समर्थ नगर हे दुचाकीवरून जात सुमारे दहा दिवसांपूर्वी जात होते. त्याचवेळी अंबड चौफुली येथून एका 32 वर्षीय महिलेने नागरे यांना लिफ्ट मागितली आणि या लिफ्टच्या दरम्यान बोलण्या बोलण्यामध्ये त्या महिलेने आपण आयुर्वेदिक औषधी विक्री करतो असे सांगितले आणि औषधीसाठी संपर्क करा असे म्हणून मोबाईल क्रमांकही दिला. त्यानंतर जगन्नाथ नागरे यांनी लिव्हरच्या औषधीसाठी या महिलेशी संपर्क केला. दिनांक 14 रोजी नागरे यांना अंबडला बोलावले  अंबड मध्ये आल्यानंतर श्रीमती भुतेकर यांनी  स्वतःच्या घरी न बोलवता दुसऱ्या महिलेच्या म्हणजेच या प्रकरणातील दुसरी आरोपी श्रीमती पवार हिच्या घरी पाठविले. ठरलेल्या ठिकाणी नागरे गेल्यानंतर त्या घरची महिला मात्र उलट सुलट बोलू लागली. त्यावेळी नागरे यांनी य दुसऱ्या महिलेने तुमच्याकडे पाठविले असल्याचे सांगितले त्यावरही या महिलेचे समाधान न झाल्यामुळे नागरे यांनी सदरील महिलेला फोन लावून  पवार या महिलेचे घरी बोलावून घेतले आणि या महिलेच्या घरी दोन महिला आणि एक गोकर्ण जोशी नावाच्या पुरुषाने  अशा तिघांनी मिळून नागरे यांना विवस्त्र केले आणि त्यांचे चित्रीकरण केले. एवढ्यावरच न थांबता चार लाखाची मागणीही केली. नाही  दिले तर हे सर्वत्र दाखवल्या जाईल अशी धमकीही दिली. शेवटी हा सौदा साडेतीन लाखांमध्ये ठरला. साडेतीन लाखांपैकी एक लाख रुपये नागरे यांनी लगेच मोबाईल वरून संबंधित महिलांना देऊन टाकले. उर्वरित अडीच लाखांचा धनादेशही दिला परंतु त्या तिघांना धनादेश वटण्याची खात्री न वाटल्याने त्यांनी नागरे यांच्याकडे असलेली अंगठी आणि आधार कार्ड ठेवून घेतले. घाबरलेल्या अवस्थेत जालन्याला परत आलेल्या नागरे यांनी बँकेमध्ये जाऊन हा धनादेश न वठवण्याच्या सूचना केल्या आणि झाले ही तसेच .तो धनादेश न वाटता परत गेला. त्यामुळे त्या तिघांनी नागरेकडे तगादा लावला.  नंतर नागरे यांनी तुम्ही जालन्याला या मी पैसे काढून देतो असे म्हटले. यावेळी या प्रकरणातील आरोपी श्रीमती भुतेकर वय 32, व्यवसाय आयुर्वेदिक औषधी विक्रेते, तसेच ज्या महिलेच्या घरी पाठवले होते ती महिला श्रीमती पवार वय 32 व्यावसायिक गृहिणी ,राहणार बाळा नगर अंबड आणि तिसरा आरोपी गोकर्ण पंडितराव जोशी वय 35 व्यवसाय शेती राहणार शिवाजीनगर अंबड हे तिघेही चार चाकी वाहनाने जाळण्यात आले.

    दरम्यानच्या काळात प्रतिष्ठेला घाबरून जगन्नाथ नागरे यांनी कुठेही वाच्यता न करता अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन सर्व आपबीती सांगितली होती. त्या अनुषंगाने श्री नोपानी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्याकडे हा तपास सोपवला या तपासा दरम्यान हे तिघेही आरोपी जालन्यात येत असल्याचे कळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या आरोपींना पकडले आणि अंबड पोलिसांच्या हवाली केले.

    बातम्यांसाठी संपर्क-दिलीप पोहनेरकर,9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    ambad jalna crime jalna police lcb अंबड अंबड पोलीस अश्लील चाळे आम्ही जालनेकर आयुर्वेद आयुर्वेदिक औषधी लिफ्ट लूट
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article“त्या”प्रकरणा नंतर आता प्रेरणा लोंढे परतूरच्या नवीन गटशिक्षणाधिकारी
    Next Article जालन्याचा पीएसआय सोनसाखळी चोरांचा प्रशिक्षक! चोपडा पोलिसांनी चौघांना पकडले रंगेहात
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    18/03/2026

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    13/03/2026

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    12/03/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,093 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,113 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,358 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,250 Views
    Don't Miss
    Breaking News 18/03/2026

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    जालना- मागील दोन वर्षाच्या रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण मंगळवार दिनांक 17 रोजी उत्साहाच्या वातावरणात…

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    पोद्दार ची “शाळा” उघड ;RTE च्या यादीत पुन्हा आले नाव.

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.