जालना- संसारामध्ये पोटाला चौथी ही  मुलगी आल्याचा राग  मनात धरून अवघ्या एक महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन त्या मुलीचा खून करण्यात आला होता. ना कुठे तक्रार ना कुठे वाच्यता, परंतु पोलिसांना या मुलीचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला आणि पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणण्याचे ठरवले.  तक्रार देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनेच देण्यात आली. अशा या किचकट तपासासाठी पोलीस प्रशासनाने जालना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका ,मदतनीस आणि आशा वर्कर्स यांची मदत घेतली. मागील सहा महिन्यांमध्ये जालना जिल्ह्यात किती मुली जन्माला आल्या ,याची सर्व माहिती गोळा करण्यात आली. त्यापैकी 500 मुलींच्या घरी पोलिसांनी विचारणा केली आणि त्यामधून सापडले ते खुनी मुलीचे आईबाप .या सर्व किचकट प्रकरणाची माहिती दिली आहे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtv jalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version