जालना- वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून मित्रा मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसण गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या करण्यामध्ये झाले. काल रात्री जालना शहरातील चंदन जीरा पोलीस ठाण्यात या हद्दीमध्ये ही घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार काल रात्री या भागात एक लग्न होते. या लग्नात मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर होता. दरम्यान सायंकाळी सात आठ वाजेच्या सुमारासच पोलिसांनी या डीजे वाल्याचा लॅपटॉप जप्त केला होता. असे असताना पुन्हा रात्री या लग्नाची वरात निघाली आणि वरातीमध्ये मित्रा-मित्रांची भांडणे झाली. त्यामध्ये किरकोळ हाणामारी ही झाली. वाद नको म्हणून या घटनेतील मृत मुलगा रोहन राहुल साळवे वय सोळा वर्ष याच्या वडिलांनी म्हणजेच राहुल साळवे यांनी राहुलला घरी घेऊन आले .त्या पाठोपाठच रोहनचे मित्र देखील हातात काही शस्त्र घेऊन रोहनच्या घरासमोर आले. तीन मजली घरासमोर हे सर्व आल्यानंतर मित्रा -मित्रांमधील ही भांडणे मिटविण्यात आली, त्यानंतर रात्री उशिरा रोहन साळवे याने रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान रात्री दीड वाजता रोहन साळवे याला त्याच्या घरच्यांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .याप्रकरणी चंदनजीरा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . तसेच या भांडणामध्ये रोहनचे दोन अल्पवयीन मित्र आणि अन्य दोघेजण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे .दरम्यान चंदनझीरा भागात पंचशील बुद्ध विहारा जवळ राहणाऱ्या रोहन राहुल साळवे याचे शविच्छेदन केल्यानंतर अकरावाजेच्या सुमारास हा मृतदेह रोहनच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. यासंदर्भात चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी देखील सविस्तर माहिती दिली आहे.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version