जालना- देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगती पथावर आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाहाची प्रथा बंद झालेली नाही. या बालविवाहा मुळे भविष्यात अनेक समस्यांना दोन्ही कुटुंबांना तोंड द्यावे लागते आणि असे बालविवाह चोरीछुपया मार्गाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात लावल्या जात. कारण साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हे एक मुहूर्त आहे आणि ते बुधवार दिनांक 30 रोजी आहे. त्यामुळे या दिवशी  लावण्यात येणारे बालविवाह शुभमंगल सावधान म्हणताच हे सावधान याच मुहूर्तावर आपल्या हातात हातकड्या पडण्यासाठी देखील कारणीभूत होऊ शकते.

शासनाने मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 हे विवाहासाठी निर्धारित केलेले आहे. या वयापूर्वी लावण्यात येणाऱ्या विवाहांना बालविवाह म्हणून संबोधल्या जाते आणि त्यामुळेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 च्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, बालक हक्कापासून वंचित राहू नयेत, या उदात्त हेतूने या कायद्याची अंमलबजावणी केल्या जाते. परंतु अनेक जण कौटुंबिक परिस्थितीमुळे मुलीचा बालविवाह करण्याच्या  आणि जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. अशा प्रकारची कृती ही कायद्याच्या विरोधात आहे .त्यामुळे असे लग्न लावताना जर वधू-वरांचे पालक जर कायद्याच्या चौकटीत सापडले तर त्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते .त्यामुळे वधू-वराच्या पालकांनी बालविवाह लावू नयेत असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती कोमल कोरे- चाटे यांनी केले आहे .दरम्यान अशा प्रकारचे कुठे विवाह लागत असतील तर त्या संदर्भात संबंधित गावच्या अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन ,जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी, तसेच चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ पोलिसांच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

ही आहेत साडेतीन मुहूर्त गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा हे तिन्ही पूर्ण मुहूर्त समजल्या जातात आणि दीपावलीची बलिप्रतिपदा याला अर्ध मुहूर्त समजले जाते. असे एकूण साडेतीन मुहूर्त आहेत ज्या मुहूर्तांसाठी नागरिक वर्षभर वाट पाहत बसतात.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version