Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » आता आणखी एक बुडाली…? स्नेहश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी!
    Breaking News

    आता आणखी एक बुडाली…? स्नेहश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी!

    EdTvBy EdTvMay 14, 2025Updated:May 14, 2025No Comments3 Mins Read242 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने घोटाळ्याची मालिका सुरू केल्यानंतर साईराम मल्टीस्टेट, छत्रपती मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट ,या अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थेनंतर आता आणखी एका अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थेने दम तोडला आहे. ती म्हणजे स्नेहश्री मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी पुणे ,खरंतर 2015 मध्ये स्थापन झालेली ही सोसायटी 2019 मध्ये जालन्यातील संचालक मंडळाने हस्तांतरित करून घेतली दरम्यानच्या काळात गुंतवणूकदारांनी ठेवलेली गुंतवणूक वेळीच परत न करू शकल्यामुळे या संस्थेच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात दिनांक 16 फेब्रुवारी2024  रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.  आता या संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांना नऊ तारखेला अटक केल्यानंतर उद्या पुन्हा न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. दरम्यान सध्या अंबड आणि जालना येथील या शाखांना कुलूप आहे. आणि दोन्ही आरोपी जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत.

    दि.27 सप्टेंबर 2024 ची बातमी

    घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथील शेतकरी लक्ष्मण ठकाजी मंडलिक यांनी सन 2019 मध्ये टप्प्याटप्प्याने या संस्थेमध्ये 15 लाखांची गुंतवणूक केली होती. लक्ष्मण मंडलिक यांना त्यांची शेतजमीन पाझर तलावात गेल्यानंतर शासनाकडून आलेला मावेजा त्यांनी टप्प्याटप्प्याने स्नेह श्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह मध्ये गुंतविला होता. एकूण 15 लाख रुपयांच्या मुदत ठेवी त्यांनी ठेवल्या होत्या. त्यांच्या गरजेनुसार त्यांनी वारंवार या शाखेची संपर्क साधून रक्कम परत मागितली परंतु ती मिळाली नाही. शेवटी वसुलीसाठी जास्त तगादा लावल्यामुळे मंडलिक यांना सोसायटीने सीएसबी बँक जालना शाखेचे तीन पाच- पाच लाखाचे धनादेश दिले. त्यानुसार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी बँकेमध्ये टाकलेला धनादेश न वटताच तो परत आला. स्नेहश्रीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण दाखविण्यात आले. त्यानंतर  संचालक मंडळाशी मंडलिक यांनी वारंवार संपर्क साधून या रकमेची मागणी केली. परंतु ती मिळाली नाही. शेवटी लक्ष्मण मंडलिक यांनी अंबड पोलीस ठाण्यात बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार नोंदविली .अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुरले यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि नऊ मे रोजी या प्रकरणातील स्नेहश्री चे अध्यक्ष शरद बाबुराव खोजे आणि  काकासाहेब साहेबराव पितळे यांना अटक केली. या दोघांना अंबड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दिनांक 15 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सोमवारी जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे हे करीत आहेत.

    पार्श्वभूमी स्नेहश्री मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये फसवणूक झाल्याची अनेक ग्राहकांची तक्रार यापूर्वीच आलेली आहे .दरम्यान दिनांक 27 सप्टेंबर 2024 ला जालना येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावर असलेल्या शाखेसमोर गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. त्यावेळी अंबडची देखील शाखा बंद होती. परंतु काही वकिलांच्या मध्यस्थीने या गुंतवणूकदाराचे पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच हे प्रकरण कदिम जालना पोलीस ठाण्यातही गेले होते परंतु तिथे कोणी लेखी तक्रार न दिल्यामुळे पुढील कारवाई झाली नाही .असे असताना येथील शाखेचे कर्मचारी वैभव जराड यांनी बँकेकडे 27 कोटींच्या ठेवी आहेत आणि कर्जवाटप 42 कोटींचे आहे त्यामुळे हे कर्ज वसूल करून ठेवीदारांची ठेवी परत करू असे म्हटले होते. तसेच पंधरा दिवसात नवीन संचालक मंडळ स्थापन होणार आहे त्यानंतर अशी अडचण येणार नाही असेही म्हटले होते. परंतु तसे न झाल्याने आता या संस्थेला कुलूप लागले आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर या शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, अंबादास साबळे, रवी गायकवाड, गजानन भोसले ,महिला पोलीस कर्मचारी निमा घनघाव, जया निकम वाहनचालक श्री .पाठक हे या तपासात सहभागी आहेत.

    सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
    दिलीप पोहनेरकर-9422219172

    beed chtrpti multistate Dnyaradha multy state co-op EOW आर्थिक गुन्हे शाखा गुंतवणूकदार jalna pune shri sairam urban multi state co-op credit society ltd-beed जालना ज्ञानराधा मल्टीस्टेट टाळा ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्नेहश्री मल्टीस्टेट shehshri multi state co-op
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleएम्स(AIIMS) च्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती म्हणजे डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा गौरव-डॉ. अनंत भास्करराव पंढरे(ABP)
    Next Article विशेष बातमी; हरवलेली विहीर, पाझर तलाव, रस्ते शोधण्यासाठी चौकशी समिती रानावनात
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20253,918 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,173 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025519 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.