जलना -बदनापूर तालुक्यातील  सोमठाणा येथील शहीद जवान सुरेश कदम यांच्या स्मरणार्थ सोमठाणा येथे शहीद स्मारक उभारण्यात आले  आहे.त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.या निमित्त ग्राम पंचायत कार्यालय सोमठाणा येथे  बी.एस.एफ. भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान रामलाल मेंढरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
मौजे सोमठाणा येथील शहिद जवान सुरेश केशवराव कदम हे भारतीय लष्करात कार्यरत असतांना मेघदूत ऑपरेशन (अभियान) दरम्यान दिनांक 21 डिसेंबर 2091 ला लद्दाख, जम्मू कश्मीर येथे त्याना वीर मरण आले होते. त्यांच्या स्मरणार्थ सोमठाणा येथे हे स्मारक उभारण्यात आले असून शहीद जवान सुरेश कदम यांचे वडील केशवराव कदम व आई गयाबाई केशवराव कदम यांच्या हस्ते हे लोकर्पण करण्यात आले. यावेळी सरपंच स्वाती संतोष नागवे, उपसरपंच सोनाली सुरेश मेंढरे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना नागवे, दिलीप मेंढरे, गौतम गायकवाड, जगन्नाथ ठाकूर,पोलिस पाटिल रमेश नागवे, ग्रामसेवक एस. जी.काथार, सोमठाणा अरोग्य उपकेंद्रचे अरोग्य अधिकारी डॉ. कुंडकर व अरोग्य कर्मचारी, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक टेकाले व सर्व शिक्षक वर्ग, गावातील जेष्ठ नागरिक रामकिसन मेंढरे, बबन नागवे , आदींचीी उपस्थिती होती .

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna

9422219172

 

Share.

Comments are closed.

Exit mobile version