जालना- जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जालना तालुक्यातील रामनगर देवमूर्ती सिंधी काळेगाव या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत .काही शेतकऱ्यांच्या जमिनीला बाजारभावानुसार करोडो चा भाव असताना शासन ही जमीन शासकीय दराने खरेदी करत आहे. शासनाच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ देवमूर्ती परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात प्रशासनासोबत वारंवार चर्चा ही झाली आहे या चर्चेतून 52 शेतकऱ्यांचाही फायदा झाला आहे. परंतु उर्वरित शेतकरी अद्यापही बाजारभावाप्रमाणेच या जमिनी खरेदी कराव्यात या मागणीवर ठाम आहेत आणि प्रशासन देखील हा धोरणात्मक निर्णय आहे तो अधिकार आम्हाला नाही या निर्णयावर ठाम आहे.दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी आज जालना जिंतूर महामार्गावर जालन्यापासून काही अंतरावर असलेल्या सिंधी काळेगाव येथे रास्ता रोको केला. या परिसरातील नागरिकांनी देखील या रास्ता रोकोला पाठिंबा दिला होता. उद्या पुन्हा जालन्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर येथे रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे.

दरम्यान आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी भेट दिली आणि सरकारवर आरोप करत असताना ते म्हणाले की या रस्त्याची कोणाचीही मागणी नव्हती परंतु केवळ उद्योग व्यापारी आणि मुठभर राज्यकर्त्यांच्या फायद्यासाठी गरज नसताना देखील या महामार्गाची निर्मिती करण्यात येत आहे.

             FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa

दिलीप पोहनेरकर –९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version