जालना- सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल करणाऱ्या रतन आसाराम लांडगे यांनी अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांना पैशाचे आम्हीच दाखवून गुंतवणूक करायला लावली. ती गुंतवणूक किरकोळ असल्यामुळे फार काही गुंतवणूकदार तक्रारीच्या भानगडीत पडले नाहीत .परंतु एक लाखाचे एक कोटी देतो म्हणत अनेक गरजूंना फसवल्यानंतर दोन दिवसांपूर्वी तालुका जालना पोलीस ठाण्यात धुळे जिल्ह्यातील दोघांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी रतन लांडगे यांच्या घरी छापा मारल्यावर जादूटोणा, अघोरी प्रथा, फसवणुकीचे साहित्य आणि मुंबईहून आलेले तिघेजण ज्यांना एक लाखाच्या बदल्यात एक कोटीचे आम्हीच दाखवण्यात आले होते, तसेच पाचशेच्या नोटा च्या आकाराचे कागदाने भरलेले पोते सापडले होते. अशा प्रकारची तक्रार पहिल्यांदाच दाखल झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांना आपली ही फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाची देखील फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.  या शिक्षकाला तब्बल 46 लाखांचा गंडा रतन आसाराम लांडगे यांनी घातला आहे या संदर्भात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.

रतन आसाराम लांडगे हे सध्या तालुका जालना पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत आहेत. त्याचदरम्यान चिखली येथील सेवानिवृत्त शिक्षक रामेश्वर उबाळे हे काही दिवसांपूर्वी जालना बस स्थानकात आले होते आणि त्यांची जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी या गावच्या एका व्यक्तीशी ओळख झाली .या व्यक्तीने पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवत रामेश्वर उबाळे यांना रतन लांडगे यांच्या घरी नेले. तिथे वेगवेगळ्या प्रकारची पूजा केली आणि थोड्या प्रमाणात पैशाचा पाऊस पाडून दाखवला .हा पाऊस पाडून दाखवल्यानंतर शिक्षकाचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि या विश्वासाचा गैरफायदा घेत रतन लांडगे यांनी या शिक्षकाकडून 46 लाख रुपये उकळले .त्यानंतर उबाळे यांनी वारंवार पैशाची मागणी केली परंतु काही ना काहीतरी विघ्न येत आहे असे म्हणत लांडगे याने पूजा करणे  आणि पैसे देणे ही टाळले. उबाळे यांनी पैशाच्या तगादा लावल्यामुळे लांडगे यांनी उबाळेंना धमक्या द्यायला सुरुवात केली. त्यामुळे हाताश झालेल्या उबाळे यांना गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. परंतु नुकताच तालुका जालना पोलीस ठाण्यात रतन लांडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक रामेश्वर उबाळे यांची हिम्मत वाढली आणि त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये जादूटोणा ,अघोरी प्रथा ,नरबळी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

             FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
   *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version