Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    खंडणी प्रकरण: आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी; खंडणीच्या पैशातून सोने वाहन आणि कॅमेऱ्याची खरेदी

    शिक्षण संस्था चालकांना काटा काढण्याची धमकी! एकदा खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मागणी

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » शिक्षण संस्था चालकांना काटा काढण्याची धमकी! एकदा खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मागणी
    Breaking News

    शिक्षण संस्था चालकांना काटा काढण्याची धमकी! एकदा खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मागणी

    EdTvBy EdTvJune 25, 2025No Comments3 Mins Read388 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- शिक्षण संस्थेच्या तक्रारी करून संस्थाचालकांशी संपर्क साधून तक्रार मागे घेण्यासाठी एकदा खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्याच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रयत्न  केला.परंतु तो फसला. संस्था चालकांचा काटा काढण्याची धमकी देणाऱ्या खंडणीबहादरांविरुद्ध चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तीन आरोपींना अटकही केले आहे.

    यासंदर्भात रवी प्रदीप खोमणे वय 36 वर्ष व्यवसाय संस्था चालक राहणार जुना जालना यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे”, की त्यांची दीप शोभा सेवाभावी संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून जालना तालुक्यातील नाव्हा येथे एस. के. कॉलेज सुरू आहे. या कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रम चालवले जातात. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्यासोबत बाळू प्रभाकर दांडगे, यज्ञेश्वर बाबुराव हिवरेकर ,अनंत अनिरुद्ध मोहिते, शिवम राजेंद्र जयस्वाल ,प्रदीप सुधाकर सातोणकर, गणेश नळगे यांचे देखील मराठवाड्यात महाविद्यालये आहेत .सुमारे एक जून 2025 रोजी संस्थाचालक अनंत मोहिते यांच्या मोबाईलवर करण विलास निकाळजे याने फोन करून तुम्ही संस्थाचालक सीनियर कॉलेजमध्ये समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जातीचे विद्यार्थ्यांचे पैसे खाता, त्यांचे अनुदान लुबाडता असे बोलून महाविद्यालय बंद पाडण्याच्या धमक्या दिल्या .त्यानंतर या संदर्भात दिनांक 3 जून रोजी संध्याकाळी वाटूर येथे सर्व संस्था चालकांची बैठक झाली.  तिथे करण विलास निकाळजे याला बोलावून घेतले .त्यावेळी करण एकटाच आला होता. चर्चा करत असताना करणं याने तक्रार मागे घेण्यासाठी पैशाची मागणी केली, आणि कमरेची बंदूक टेबलवर ठेवली . त्यावेळी आम्ही सर्वजण घाबरलो तक्रार मागे घ्यायचे असेल तर मला पैसे द्या नाहीतर काटाच काढतो अशी धमकी दिल्यामुळे सात संस्था चालकांनी प्रत्येकी पाच लाख रुपये दिले. तसेच बाळू दांडगे यांनी पाच लाखांचा धनादेश दिला जो दुसऱ्या दिवशी वटवण्यात आला .त्या नंतर  करण निकाळजे हा निघून गेला.आणि आता तुम्हाला कोणी त्रास देणार नाही असे सांगितले.

    त्यानंतर पुन्हा दिनांक 18 जून 2025 ला सुरेश खंडाळे यांनी करण निकाळजे यांच्याप्रमाणेच समाज कल्याण विभागात दुसरा अर्ज दिला आणि या अर्जासंदर्भात भेटण्यासाठी पुन्हा संस्थाचालक तक्रारदार सुरेश खंडाळे यांना दिनांक 19 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपाहारगृहात भेटलो.तिथे करण   निकाळजे देखील सोबतच होता तिथे करणला यापूर्वी झालेल्या व्यवहारा संदर्भात विचारले असता तो म्हणाला की मामाला पैशाची गरज असेल त्यामुळे त्यांनी मागणी केली आहे .या संदर्भात आपण उद्या भेटू..त्या  बैठकीनंतर पुन्हा दिनांक 20 रोजी छत्रपती छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये पुन्हा भेटण्याचे ठरले .या हॉटेलमध्ये गेल्यानंतर करण निकाळजे याचा भाऊ रुपेश निकाळजे हा बसलेला होता .त्यानंतर सुरेश खंडाळे व त्यांचा मुलगा बंटी उर्फ गौरव खंडाळे तिथे आले आणि प्रत्येकी दहा लाख रुपये द्या अशी एकूण 70 लाख रुपयांची मागणी केली. नाही तर माझा हिसका दाखवतो अशा प्रकारची धमकी दिली अशी तक्रार रवी खोमणे यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

    दरम्यान या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 308( 5) अन्वये दिनांक 24 रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मध्ये करण विलास निकाळजे सुरेश खंडाळे गौरव उर्फ बंटी खंडाळे रुपेश निकाळजे आणि इतर साथीदारांवर हा गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्रीच करण निकाळजे मयूर निकम निलेश निकाळजे यांना अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

                         FOLLOW US
    https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
    https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
    follow this link to join whatsApp group
    https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
       *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    # बंदूक# सेवाभावी संस्था# महाविद्यालय# समाज कल्याण विभाग# अनुदान#crime political शिक्षण संस्था चालक# खंडणी# चंदंजिरा पोलीस ठाणे#jalna police
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleसातबारा बनावट, पेरा ही बनावट; शासनाला लावला एक कोटीचा चुना
    Next Article खंडणी प्रकरण: आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी; खंडणीच्या पैशातून सोने वाहन आणि कॅमेऱ्याची खरेदी
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    June 26, 2025

    खंडणी प्रकरण: आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी; खंडणीच्या पैशातून सोने वाहन आणि कॅमेऱ्याची खरेदी

    June 25, 2025

    सातबारा बनावट, पेरा ही बनावट; शासनाला लावला एक कोटीचा चुना

    June 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,048 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025868 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025802 Views
    Don't Miss
    Breaking News June 26, 2025

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    जालना- अवघा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याची नोकरी झटपट…

    खंडणी प्रकरण: आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी; खंडणीच्या पैशातून सोने वाहन आणि कॅमेऱ्याची खरेदी

    शिक्षण संस्था चालकांना काटा काढण्याची धमकी! एकदा खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मागणी

    सातबारा बनावट, पेरा ही बनावट; शासनाला लावला एक कोटीचा चुना

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    खंडणी प्रकरण: आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी; खंडणीच्या पैशातून सोने वाहन आणि कॅमेऱ्याची खरेदी

    शिक्षण संस्था चालकांना काटा काढण्याची धमकी! एकदा खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मागणी

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.