जालना -आज गुरुपौर्णिमा ,गुरु शिष्यांच नातं कसं असावं , गुरूंचं आयुष्यामध्ये काय स्थान आहे .देवा पेक्षाही मोठा मान गुरूंना दिला जातो .त्याच गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन, साष्टांग प्रणाम करून आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा आजचा दिवस. आपल्याला प्रत्येक क्षेत्रात “गुरु” मिळतो. परंतु त्या सर्वांनाच आपण गुरु मानतोच असे नाही .जो आपल्याला सन्मार्गाला लावतो, ज्याच्या आशीर्वादामुळे आपण भक्कमपणे संकटांना तोंड देऊ शकतो, चरितार्थ चालू होऊ शकतो आणि ज्याच्या भरोशावरच आपण आयुष्याचा गाडा ढकलत सर्व भार ज्याच्यावर टाकतो त्यालाच आपण गुरु मानतो .
या गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीराम संस्थान आनंदवाडी येथील रामदास आचार्य महाराज यांनी त्यांचा गुरु बद्दलचा अनुभव सांगताना अंगावर रोमांच उभे राहतात. बाल वयातच गुरूंच्या घरी झोपडीमध्ये वरून साप आणि खालून विंचू पाहिल्यानंतर गुरुगृहातून धूम ठोकणाऱ्या ( पळून जाणाऱ्या) या विद्यार्थ्यावर गुरुने एवढी कृपा केली ,की परीक्षेला गैरहजर असतानाही उत्तर पत्रिकेच्या गठ्ठ्यामध्ये या विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका निघाली. त्यामुळे सहाजिकच गुरूंनी माझ्यासाठी एवढं का बरं केलं? ही भावना मनामध्ये आल्यानंतर डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्याशिवाय राहत नाहीत . हे सर्व होण्यासाठी गुरुकृपाच असावी लागते .असा ठाम विश्वासही रामदास महाराजांनी व्यक्त केला आहे .खरंतर रामदास महाराजांनी शिकू नये असं त्यांच्या गुरूंना वाटत होतं .त्यावेळी रामदास महाराजांना महाराजांबद्दल काय वाटलं !हे देखील महाराज आवर्जून सांगतात. कोण होते गुरु? कसे होते गुरु? कोणत्या गुरूंनी लिहिलं पत्र? कोणत्या गुरूंची झाली कृपा ? गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ? गुरु का करावा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी गुरु शिष्याच्या या नात्याला उजाळा देणारी ही मुलाखत.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२