जालना -जिल्ह्यासाठी वैभवाची बाब असलेली संस्था म्हणजे जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी. ही प्रबोधिनी जिल्हा परिषदेने, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उभी केलेली संस्था आहे. सन 2019 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविला आणि यातून आतापर्यंत शेकडो राज्यस्तरीय खेळाडू निर्माण झाले. सुसज्ज मैदान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळासाठी मिळणारे प्रोत्साहन, योग्य प्रशिक्षक या जोरावर या संस्थेने आत्तापर्यंत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. परंतु या संस्थेचे व्यवस्थापक प्रमोद खरात यांच्यावर (POCSO) लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण या कायद्याअंतर्गत कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्याकडे हा तपास असताना त्यांनी प्रमोद खरात यांना अटक करून आज सोमवारी न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने प्रमोद खरात यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कदीम जालना पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीमध्ये जालना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी म्हटले आहे ,की केंद्रप्रमुखा सोबत आपण या संस्थेची तपासणी केली असता अनेक विद्यार्थ्यांनी प्रमोद खरात हे कुठल्या ना कुठल्या तरी बहाण्याने मुलींच्या अंगाला स्पर्श करतात ,मग तो कधी आजारी पडलेल्या मुलीला ताप तपासण्याचा बहाणा असेल किंवा शाबासकी देण्याच्या निमित्ताने पाठीवरून हात फिरवणे असेल. या अशा प्रकारामुळे मुलींच्या मनाला लज्जा उत्पन्न होते तसेच, ज्या भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर जात नाही अशा ठिकाणी नेऊन हा प्रकार केला जातो. असा आरोप या तक्रारीत केला आहे.

या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषद शिक्षक आपल्या पगारातून काही निधी देतात आणि जिल्हा परिषदेच्या आलेल्या उपकरातून ही संस्था चालते. या संस्थेला शासनाचे कोणतेही अनुदान नाही. परंतु अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने इथे विद्यार्थ्यांची निवड केल्या जाते आणि ते क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवतील याकडे लक्ष दिले जाते .इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत या ठिकाणी निवासी विद्यार्थी आहेत त्यामध्ये 46 मुले आणि 48 मुलीआहेत .विशेष म्हणजे इथे दहा कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी नऊ कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत ,तर केवळ प्रमोद खरात हे एकच व्यवस्थापक शासकीय कर्मचारी म्हणून आहेत. प्रमोद खरात हे कडक स्वभावाचे म्हणून सर्व परिस्थितीत आहेत. त्यातच पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संस्थेला भेट देऊन संस्थेचे कौतुकही केले होते. कदाचित त्याचाही परिणाम गुन्हा दाखल करण्यावर झाला की काय? अशीही चर्चा आता शिक्षण क्षेत्रात व्हायला लागली आहे. प्राप्त माहितीनुसार यासंदर्भात तक्रारदाराने आपली तक्रार थेट पोलीस अधीक्षकांकडे केली होती आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती भागवत यांनी  उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमोद खरात यांच्यासोबत केली होती. या चौकशीनंतर हा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

                     FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
   *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version