जालना- आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागास असलेल्या विद्यार्थ्यांना महाराजा अग्रसेन फाउंडेशन तर्फे अग्रसेन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे यासंदर्भात या फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. रामलाल अग्रवाल यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ शिवाजीराव मदन प्राध्यापक डॉ. दिलीप अर्जुने ,प्राध्यापक श्री बोराडे, श्रीमती प्रतिभा श्रीपत यांची उपस्थिती होती.


सण 2019 -20 पासून ही शिष्यवृत्ती होतकरू विद्यार्थ्यांना आणि आर्थिक परिस्थिती दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. दरवर्षी दोन लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये विभागून दिला जाते .परंतु आवश्यकता भासल्यास या रकमेमध्ये वाढही करण्याचा मानस या समितीने व्यक्त केला आहे. या शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी हा व्यावसायिक किंवा तांत्रिक अभ्यासक्रमाला प्रथम वर्गात प्रवेश घेतलेला असावा. म्हणजेच अभियांत्रिकी व्यवस्थापन शास्त्र औषधी शास्त्र आदी शासनमान्य महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असावा तो जालना जिल्ह्यातीलच रहिवाशी असावा. विद्यार्थी शासकीय किंवा इतर शिष्यवृत्तीधारक नसावा .या संदर्भातील अर्ज जे.इ.एस. महाविद्यालयासमोर असलेल्या अग्रसेन भवन मध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध आहेत आणि ते लगेच भरून द्यायचे आहेत.

Follow the Edtv News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
Follow You tube https://youtube.com/@edtvjalna5167?si=U3z9PKDBIQ4vPTAk
Web-www.Edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172
