जालना- परतूर विधानसभा मतदार संघात अवघ्या दीड हजार वस्तीच अकोली नावाचे एक गाव आहे. या गावांमध्ये गेल्या पाच वर्षात सुमारे 23 कोटींची विविध विकास कामे झाली. यामध्ये पानंद रस्ते, शेततळे, भूमिगत गटार, शेतकऱ्यांना विहिरी ,अशा प्रकारची कामे झाली. एवढ्या मोठ्या निधीमध्ये गावाचा संपूर्ण विकास होऊन शेजारच्या गावांनी, अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी करणं अपेक्षित होतं .आताही भेटी देत आहेत परंतु ते तुच्छतेच्या नजरेने .कारण गेल्या वर्षभरापासून गावातील काही नागरिकांनी या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली आहे.


फक्त मागणीच नाही केली तर उपोषण, आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्हा परिषदेमध्ये चकरा, हे सर्व प्रकार करून थकले तरी देखील अधिकाऱ्यांना घाम फुटत नाही. मे महिन्यामध्ये या तक्रारीची कशीबशी दखल घेऊन चोरी गेलेल्या विहिरी ,चोरी गेलेले रस्ते, चोरी गेलेल्या भूमिगत गटार, चोरी गेलेले तलाव, यांची चौकशी करण्यासाठी घनसावंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती जाऊन आली. याचा अहवाल देण्यासाठी 18 ऑगस्ट पर्यँयं हे चार महिने उजाडले. या अहवालात कोणत्याही समिती सदस्य मधील अधिकाऱ्याची सही नाही, गावामध्ये तक्रारदार ,सरपंच ,ग्रामसेवक ,किंवा साक्षीदार यांचा कोणाचाही जवाब नाही ,कामाची मुद्देनिहाय मांडणी नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंग राजपूत यांनी हा अहवाल पूर्ण देण्यासाठी श्री. जाधव यांना 24 ऑगस्टला पत्र दिले तो अहवाल अजून आलाच नाही. म्हणून याच पत्राला पुन्हा एकदा कॉपी-पेस्ट करून एक प्रत एक डिसेंबर रोजी पुन्हा पाठविण्यात आली आहे. चौकशी झालेल्या या गावचा अहवाल मागील आठ महिन्यापासून का येत नाही त्यासंदर्भात कारवाई न करता केवळ नोटीस देऊन वेळ काढूू पणा केला जात आहे. त्यामुळे कालांतराने तक्रारदार आपोआपच प्रकरण विसरतात आणि अधिकाऱ्यांना देखील दिशाभूल करणारी माहिती देता येते. त्यासाठी हा सर्व खटाटोप चालण्याचे सध्या तरी दिसत आहे. दरम्यान 15 ऑगस्ट ला अकोली गावच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. तरीदेखील या अधिकाऱ्यांनी काहीच हालचाली न केल्यामुळे आता या प्रकाराचा स्पोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मागील महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पीएम मिनू यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या चौकशी समिती दिलेली चौकशी पूर्ण करत नाही त्या चौकशी समितीची चौकशी करण्याचे सुतवाचक केले होते. त्यामुळे सध्या अधिकारी काही ना काही उत्तर देऊन श्रीमती मिनू यांची दिशाभूल करण्याच्या तयारीत आहेत. परंतु उद्या जर या प्रकरणाचा स्पोट झाला तर श्रीमती मिन्नू यांच्यावरच जबाबदारी निश्चित होणार आहे, त्यामुळे आता श्रीमती मिनू या दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी घालतात का सर्वसामान्यास जनतेला आत्मदहनापासून परावृत्तत करतात याकडे लक्ष लागले आहे .यासंदर्भातील अकोली गावच्या अकोली गावच्या या संदर्भातील बातम्यांची लिंक खाली दिली आहे
-दिलीप पोहनेरकर,9422219172
